थोडी लाज असती तर देश सोडून गेले असते… सालियन प्रकरणात रामदास कदमांची उडी ! ठाकरे पित्रा-पुत्राला घेरले

Ramdas Kadam On Aaditya Thackeray : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरण आता पुन्हा तापले आहे. दिशा सालियनच्या (>) वडिलांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. माझ्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप यात केला आहे. दिशा सालियनच्या घरी झालेल्या पार्टीला आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया हे उपस्थित होते, असे याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात पडले आहे. त्यावरून मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहे. तर आता शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीही आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) व उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
मोठी बातमी! राणा दुग्गूबाती, प्रकाश राज यांच्यासह 25 सेलिब्रिटींवर एफआयआर दाखल; कारण काय?
दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. नारायण राणे यांनी जाहीरपणे सांगितले होते या घटनेशी आदित्य ठाकरे यांचा संबंध आहे. त्यांच्याकडे पुरावे होते. दुर्देवाने ते आतापर्यंत कुठलेही पुरावे देऊ शकलेले नाहीत. प्रश्न असा येतो की पुन्हा अडीच वर्षानंतर दिशा सालियन यांच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया या तिघांनी माझ्या मुलीवर बलात्कार केला आणि खून केला. त्यामुळे आदित्य ठाकरेवर गुन्हा दाखल करावा, अशी याचिका दाखल केला आहे. ही बाब गंभीर असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
मोठी बातमी! राणा दुग्गूबाती, प्रकाश राज यांच्यासह 25 सेलिब्रिटींवर एफआयआर दाखल; कारण काय?
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होतो. ही साधी बाब नाही. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी मुलींची अब्रू वाचविली आहे. त्यासाठी भगवा झेंडा खांद्यावर घेऊन शिवसेना काढली. त्यांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होत आहे. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना थोडी लाज, लज्जा, इज्जत असती तर तोंडाला काळे फासून देश सोडून गेले असते, असा हल्लाबोल रामदास कदमांनी केलायं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांची भिती संपली ! भारतीय शेअर बाजारात चौथ्या दिवशी मोठी तेजी
उद्धव ठाकरेंचा पलटवार
दिशा सालियन प्रकरणावरून होत असलेल्या आरोपाला शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या पिढ्यान् पिढ्या जनतेसमोर आहेत. त्यामुळे या विषयात काहीही तथ्य नाही. आमचा या प्रकरणाशी दूर दूर पर्यंत काहीही संपर्क नाही. पण यावर राजकारण वाईट बाजूला न्यायचं असेल तर सर्वांचीच पंचाईत होईल. खोट्याचा नायटा करायचा असेल तर तो त्यांच्यावर देखील बुमरॅंग होऊ शकेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय.