‘रामदास कदम माणूसच घाणेरडा’; भास्कर जाधवांची कदमांवर जळजळीत टीका
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam : रामदास कदम (Ramdas Kadam) माणूसच घाणेरडा असल्याची जळजळीत टीका ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे. दरम्यान, राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनानंतर भास्कर जाधव यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या अनेक नेत्यांवर सडकून टीका केली आहे.
आमदार जाधव म्हणाले, मी विरोधकांना असे शब्द मारतो ते आयुष्यभर पुरत असून मी कोणाची ठरवून नक्कल करीत नाही. नारायण राणेंसह, नितेश राणे यांच्यावर मी बोलत असतो. त्यानंतर रामदास कदमांना बामलाव्या बोललो, संतोष बांगरला अस्वल बोललो, चंद्रशेखर बावनकुळेंना वेस्ट इंडिजच्या प्लेअरची उपमा मी दिली किंवा एकनाथ शिंदेंची नक्कल, हे मी काही ठरवून नाही केलं. केल्यानंतर मला समजलं की हे आपण कसं काय केलं. केल्यावर ते मला जमतं, असं भास्कर जाधव मिमिक्रीवर बोलताना म्हणाले आहेत.
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याविरोधात व्यापारी मुख्यमंत्र्यांना तक्रार करणार, कारण…
तसेच रामदास कदम आणि गजानन किर्तीकर हे दोघेही बादच झालेले आहेत. यांना परत कोणी घेतलं तर त्याचा पक्षावर सत्कारात्मक नाहीतर नकारात्मक परिणाम होईल. गजाभाऊंनी आपली पातळी सोडली नाही पण कदमांनी सोडली आहे. एकाच पक्षात राहुन सोबत राहुन एकमेकांवर असे कसे बोलता? गजाभाऊंना पराभूत करण्यासाठी अनेक प्रयत्न कदमांनी केलेले आहेत. कोकणात कदमांनी अनेकांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला. एवढं सगळं करुन नंतर मी निष्ठावंत असं दाखवतो, माणूस म्हणून तो योग्य नसून रामदास कदम माणूसच घाणेरडा असल्याची टीका जाधव यांनी केली आहे.
तसेच एकमेकांमध्ये मतभेद असतात पण आपण माणसांना तोडायचं नसतं. रामदास कदमांना फक्त स्वत:चा स्वार्थ दिसतोयं. रामदास कदम माणूसच घाणेरडा आहे.
एवढं सगळं मिळाल्यावर आज तो उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या भाषेत टीका करीत आहे, तसं आजपर्यंत कोणीच बोललेलं नसल्याचंही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, शिवसेनेत बंडानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारेंकडून टीकेची तोफ डागली जात आहे. तर शिंदे गटाकडून रामदास कदम, भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडून टीकांना प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर टीका केल्याने या टीकेवर रामदास कदम नेमकं काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.