Bhaskar Jadhav : राणे, शिंदेंची मिमिक्री अन् रामदास कदमांना बामलाव्या का म्हणतात? भास्कर जाधवांनी सांगून टाकलं
Bhaskar Jadhav : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी शिवसेना शिंदे गटासह (Shiv Sena Shinde group) भाजप (BJP)नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)आणि त्यांच्या मुलांवर खालच्या पातळीवर टीका, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांची मिमिक्री कशी जमते? त्याचबरोबर शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam)यांना बामलाव्या नेमकं का म्हणतात? याबद्दल भास्कर जाधव यांनी लेट्सअपशी बोलताना स्पष्टचं सांगितलं आहे.
तिकीट मिळाल्यास खासदारकीलाही गुलाल उधळणार! धंगेकरांचा शड्डू
भास्कर जाधव यांनी सांगितले की, आपल्या घराण्याला कुठलीही राजकीय परंपरा नाही. आपल्या आई किंवा वडिलांच्या घराण्यामध्ये कोणीही राजकारणात नव्हते. आपल्याला ही वक्तृत्वकला कशी मिळाली? याबद्दल सांगताना ते म्हणाले की, उभा राहताना ठरवून काही नसतं. आपण बोलताना हातात कागद घेऊन उभा राहतो पण ते कागदातलं असतंच असं नाही. ते उपजत झालं आहे. हे होत असतानाच आपली भाषणं जहाल असली माझे शब्द समोरच्या माणसाला बाणाप्रमाणं लागत असतील तरी माझ्या भाषेचा दर्जा कधी खालावत नाही.
तिकीट मिळाल्यास खासदारकीलाही गुलाल उधळणार! धंगेकरांचा शड्डू
त्याला अपवादात्मकरित्या नारायण राणे यांच्यासारख्यांना किंवा त्यांची जी मुलं आहेत त्यांना बोलतो कधीकधी. पण माझ्या भाषेमध्ये शिवराळपणा नसतो. माझ्या भाषेमध्ये कधी कोणाची बायका, मुलं, मुली किंवा त्या माणसाचंसुद्धा चारित्र्यहणन आपण कधीच कोणाचं करत नाही. पण तरीसुद्धा देवाच्या कृपेनं आपल्याला अशी भाषा लाभली आहे की समोरचा माणूस घायाळ होतो आणि कदाचित ते आपलं भांडवल असावं असेही भास्कर जाधव म्हणाले.
रामदास कदम यांच्यावर टीका करताना बामलाव्या-बामलाव्या असं म्हणाले होते त्याची खूप चर्चा झाली होती. त्याबद्दल भास्कर जाधव म्हणाले की, त्याचं असं आहे की, आपण काही लोकांना असे शब्द मारतो की ते त्यांना आयुष्यभर पुरतात. नारायण राणे यांना बोललो त्यांच्या मुलांना बोललो, त्याचबरोबर संतोष बांगर यांना अस्वल बोललो.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्धव ठाकरे यांच्यावर जास्तच बोलायला लागले त्यावेळी त्यांना वेस्टइंडिजच्या एका खेळाडूची उपमा दिली. किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल केली, हे काही आपण ठरवून केलं नाही. एकनाथ शिंदे यांची जी काही नक्कल केली, त्यानंतर काही वेळानं मी पाहिलं आणि माझाच त्यावर विश्वास बसला नाही. त्यामुळं नक्कल होते, मिमिक्री होते हे खरं आहे पण ठरवून होते असं काही नाही पण ते जमतं असंही यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.
मध्यंतरीच्या काळात शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि गजानन किर्तिकर यांच्यामध्ये लोकसभेच्या जागेवरुन वाद झाले. त्यावरुन दोघांपैकी कोणीतरी शिवसेना ठाकरे गटाकडे येतील का? असा प्रश्न विचारला, त्यावर भास्कर जाधव म्हणाले की, दोघेही तसे बादच झालेले आहेत, संपलेले आहेत. जर त्यांना कोणी पक्षात घेतलं तर त्याचा पक्षावर सकारात्मक परिणाम न होता त्याचा नकारात्मक परिणाम होईल असेही ते म्हणाले.
ही माणसं काय पात्रतेची आहेत, म्हणजे गजाभाऊ बोलले त्यांनी आपली लेव्हल नाही सोडली पण रामदास कदमांनी त्यांच्या वैयक्तिक जिवणावर, त्यांच्या किती बायका आहेत? असे प्रश्न विचारले. काय तुम्ही आयुष्यभर एकत्र काम केलं. आपल्या एकमेकांच्या सहकाऱ्यांबद्दल असं बोलतो आणि आता पुन्हा एकाच पक्षात काम करता, उमेदवारी करता. तुमच्याकडे काही कौशल्य असलं पाहिजे.
त्याचवेळी रामदास कदम यांनी गजानन किर्तिकर यांना पराभूत करण्यासाठी 1990 पासून किंवा त्याच्या आधीपासून केलेले प्रयत्न आपल्याला माहित आहेत. कोकणामध्येही रामदास कदम यांनी अनेकांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले. आणि वरुन आपल्यासारखा निष्ठावान कोणी नाही असं स्वतःला म्हणवून घेतात. त्यामुळे ही माणसं म्हणून घेण्याच्या योग्यतेचीच नाहीत, अशीही घणाघाती टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली.