Sonu Sood : कधी मदतीचा हात तर कधी थेट अ‍ॅडव्हेंचर; सोनूने केली एपिक रोलरकोस्टर राइड

Sonu Sood : कधी मदतीचा हात तर कधी थेट अ‍ॅडव्हेंचर; सोनूने केली एपिक रोलरकोस्टर राइड

Sonu Sood : कोरोना काळात गरिबांसाठी देवासारखा धावून आलेला सोनू सूद (Soonu Sood) अद्याप मदत कार्यात गुंतला आहे. तसेच तो त्याच्या स्टाईलसाठी देखील तेवढाचं प्रसिद्ध आहे. यावेळी त्याने फतेह चित्रपटाच्या शुटींग दरम्यान एक एपिक रोलरकोस्टर राइड केली आहे. त्याने चक्का शर्टलेस होत हिमालयाच्या पर्वत रागांमध्ये बाईकस्वारी केली आहे.

अंतरवली सराटीतील दगडफेक प्रकरणी ऋषिकेश बेद्रेला जामीन मंजूर, जालना आणि बीडमध्ये नो एंट्री

हा रोमांचक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये सोनू चक्का शर्टलेस होत हिमालयाच्या पर्वत रागांमध्ये बाईकस्वारी करताना दिसतोय तर त्याच्यासोबत क्रु देखील गाड्यांवर दिसत आहे. पर्वतांच्या ह्रदयाचे ठोके चुकवणाऱ्या वळणांवर सोनूची बाईकस्वारी सुरू आहे. या व्हिडीओला अॅनिमल चित्रपटातील गाणं देखील लावण्यात आलं आहे.

अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) त्याच्या डेब्यू प्रोडक्शन ‘फतेह’ या (Fateh Movie) सिनेमासाठी चित्रीकरण पूर्ण केल्याने चाहत्यांसाठी आगामी प्रोजेक्टच्या पडद्यामागील एक खास सफर बघायला मिळाली आहे. त्याने थोड्या निवांत क्षणांची चे काही खास फोटो त्याच्या सोशल मीडियावर (social media) शेयर केले. शांतता आणि थ्रिल चा आनंद घेण्यासाठी सोनू ने त्याच्या व्यस्त चित्रीकरणाच्या वेळापत्रकातून ब्रेक घेऊन ही खास ट्रीप केली.

Kareena Kapoor: ‘कुर्बान’मधील सैफ अली खानसोबतच्या इंटिमेट सीनविषयी करीनाने सोडले मौन

सोनूचा ( Sonu Sood ) आगामी “फतेह” हा सिनेमा अ‍ॅक्शन सीनने भरलेला आहे. अलीकडेच सोनूने काही खास फोटो सोशल मीडियावर शेयर केले असून पडद्यामागील फोटोंची सोनूने खास झलक दाखवली आहे. सोनू सूद आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांच्या आकर्षक ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची एक आकर्षक झलक चाहत्यांना बघायला मिळाली होती. यामुळे हॉलिवूड-शैलीचा थरार अनुभवण्यासाठी आता चाहते उत्सुक झाले आहेत. झी स्टुडिओज, शक्ती सागर प्रॉडक्शनच्या सहकार्याने “फतेह” या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube