Kareena Kapoor: ‘कुर्बान’मधील सैफ अली खानसोबतच्या इंटिमेट सीनविषयी करीनाने सोडले मौन

Kareena Kapoor: ‘कुर्बान’मधील सैफ अली खानसोबतच्या इंटिमेट सीनविषयी करीनाने सोडले मौन

Kareena Kapoor Sex Scene: बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) नेहमीच चर्चेत असतात. चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते. 16 ऑक्टोबर 2012 रोजी त्यांचे लग्न झाले आहे. पण लग्नाआधी दोघेही जवळपास 5 वर्षे एकत्र राहत होते. आता नुकतचं झालेल्या एका मुलाखतीमध्ये करीना कपूर खानला कुर्बान (Kurbaan Movie) चित्रपटात सैफ अली खानसोबत इंटिमेट सीन देण्याबाबत विचारण्यात आले होते. यावर अभिनेत्री करीना कपूरने वक्तव्य केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)


अलीकडेच करीना कपूर खान सिद्धार्थ मल्होत्राच्या गोलमेज कार्यक्रमाचा एक भाग बनली होती. अभिनेत्याने तिला चित्रपटात सैफसोबत जवळीक करण्याबद्दल प्रश्न केला. यावर अभिनेत्री हसली आणि म्हणाली, “मला कोणतीही अडचण नव्हती कारण आम्ही आधीच एकमेकांना डेट करत होतो. आम्ही दोघांनी कुर्बानसाठी एकत्र ऑडिशन दिले होते, त्यामुळे आम्हा दोघांसाठी गोष्टी अगदी सुरळीत झाल्या. आम्ही करू शकत नाही असे काहीही नव्हते. आम्ही दोघेही कॅमेऱ्यांसमोर एकमेकांसोबत आरामात होतो. कोणतीही अडचण नव्हती. ” तेव्हा यावर काजोल हसली आणि म्हणाली, “ती या दोघांची खाजगी ऑडिशन होती.” याच कारणामुळे सैफ अली खानशी लग्न केले आहे.

करीना कपूरने ‘द डर्टी’ मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानशी लग्न करण्याच्या कारणाविषयी सांगितले होते, “आता तुझ्या लग्नाचे कारण हे आहे की तुला मूल व्हायचे आहे, बरोबर?? मला असे म्हणायचे आहे की, जर तसे झाले नाही तर तुम्ही फक्त एकत्र राहू शकता. सैफ आणि मी पाच वर्षे एकत्र होतो, म्हणून जेव्हा आम्ही पुढचे पाऊल उचलले, तेव्हा आम्हाला मुले व्हायची होती.” करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी 2016 मध्ये त्यांचा पहिला मुलगा तैमूर अली खान आणि 2021 मध्ये दुसरा मुलगा जेह अली खानचे स्वागत केले.

Amrita Subhash: मित्रासोबत इंटिमेट सीन्सबद्दल अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

करीना कपूर वर्कफ्रंट

करीना कपूर खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच नेटफ्लिक्सच्या ‘जाने जान’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले होते. या चित्रपटात करीना कपूरशिवाय जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. आता ती लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सिंघम 3’मध्ये दिसणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube