मोठी बातमी! राणा दुग्गूबाती, प्रकाश राज यांच्यासह 25 सेलिब्रिटींवर एफआयआर दाखल; कारण काय?

FIR Against Celebrity : चित्रपट सृष्टीतून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेलंगणा पोलिसांनी (Telangana News) तब्बल 25 दिग्गज कलाक आणि सोशल मीडिया स्टार्सना जोरदार झटका दिला आहे. बेकायदेशीर सट्टेबाजी आणि जुगाराचे अॅप्स यांच्याशी संबंधित हे प्रकरण आहे. या प्रकारांना प्रोत्साहन देण्याचा आरोप या अभिनेत्यांवर ठेवण्यात आला आहे. उद्योजक फणिंद्र शर्मा यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या अभिनेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. या बातमीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.
ज्या अभिनेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात राणा दुग्गुबाती, प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मांचू यांच्यासह 25 अभिनेत्यांचा समावेश आहे. बेटिंग अॅप्सचा प्रचार करण्याचा आरोप या अभिनेत्यांवर ठेवण्यात आला आहे. तक्रारकर्त्याने दावा केला आहे की 16 मार्च रोजी काही युवकांशी चर्चा करताना लक्षात आले की सोशल मीडियावर प्रमोट केल्या जाणाऱ्या बेटिंग अॅप्सवर पैसे लावण्यास प्रोत्साहीत झाले होते. या अॅप्सना प्रमोट करण्यासाठी या सेलेब्रिटींकडून भरघोस पैसे घेतले जात असल्याच आरोपही फणिंद्र शर्मा यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
मोठी बातमी! तेलंगाणातील चकमकीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलाचं यश
या सेलिब्रिटींमुळेच लोक या बेटिंग अॅप्सवर पैसे लावण्यास प्रवृत्त होतात. ते देखील या अॅप्सवर पैसे लावणार होते. मात्र आर्थिक अडचणींमुळे शक्य झाले नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंजागुट्टा पोलिसांनी 11 फिल्मी सेलिब्रिटींविरुद्ध खटला दाखल केला होता. यामध्ये किरण गौड, विष्णू प्रिया, श्यामला, इमरान खान, रितू चौधरी, हर्ष साई, टेस्टी तेजा आणि बंडारू शेषयानी सुप्रिया यांचा समावेश होता. या सर्वांविरुद्ध 318 (4) बीएनएस 3,3 (ए), 4 टीएसजीए आणि 66 डी आयटी अॅक्ट 2008 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता.