मोठी बातमी! तेलंगाणातील चकमकीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलाचं यश

मोठी बातमी! तेलंगाणातील चकमकीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलाचं यश

Telangana News : तेलंगाणातील मुलुगू जिल्ह्यातील जंगलात सीमा सुरक्षा दलाचे पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार धुमश्चक्री उडाली. या चकमकीत पोलिसांनी सात नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळवलं. देशभरातून नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्याचं सरकारचं धोरण आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला या नक्षलवाद्यांकडून सातत्याने आव्हान दिलं जात आहे. त्यामुळे या नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवादी आणि नक्षलवाद विरोधी दल ग्रेहाऊंड्स यांच्यात मुलुगू जिल्ह्यातील एतुरनगरममधील जंगलात चकमक उडाली. या चकमकीत सात नक्षलवादी मारले गेले आहेत. मयतांत नक्षलवाद्यांच्या प्रमुख नेत्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो; पुन्हा चळवळीत गेलो तर गोळ्या घालेन, असं का म्हणाले गडकरी?

जंगलात शोध मोहीम सुरू असतानाच ग्रेहाउंडसच्या जवानांना नक्षलवाद्यांचा एक गट दिसला. परंतु, नक्षलवाद्यांनी जवानांना पाहताच त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. मग जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात सात नक्षलवादी ठार झाले. पोलिसांकडून या भागात अजूनही शोध मोहीम सुरू असून नक्षलवाद्यांचा कसून शोध घेतला जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळखही पटली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अनेक आधुनिक शस्त्रे जप्त केली आहेत. या चकमकीत पोलिसांनी दोन एके 47 रायफली आणि अन्य हत्यारे हस्तगत केली आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मागील काही वर्षांत मुलुगू जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी चकमक आहे. या चकमकीत सुरक्षा दलाच्या पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.

गडचिलोरी पोलिसांची मोठी कारवाई, निवडणुकीत घातपाचा कट उधळला, 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान

दरम्यान, मागील 21 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात दोन लोकांची हत्या झाली होती. पेनुगोलू कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली होती. नक्षलवाद्यांनीच या हत्या केल्याचे सांगितले जात होते. या मृतदेहांबरोबर एक चिठ्ठी देखील सापडली होती. यात म्हटले होते की मयत दोघे गुप्त माहिती राज्य पोलिसांच्या विशेष गुप्तचर यंत्रणेला देत होते. या संशयावरून नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केल्याचे सांगण्यात आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube