गडचिलोरी पोलिसांची मोठी कारवाई, निवडणुकीत घातपाचा कट उधळला, 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान
5 Naxalite Killed : गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli Police) आज भामरागड तालुक्यातील कोपर्शीच्या जंगलात मोठी कारवाई केली. छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर पोलीस दलाने 5 नक्षलवाद्यांचा (Naxalite) खात्मा केला आहे. गडचिलोरी पोलीस दलाच्या C60 कमांडोच्या 22 तुकड्या आणि क्यूएटीच्या 2 तुकड्यांनी ही कारवाई केली. या घटनेला गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दुजोरा दिला.
Emerging Asia Cup 2024 मध्ये भारताने UAE चा सात विकेटने उडवला धुव्वा, अभिषेक शर्मा ठरला हिरो!
विधानसभा निवडणुकीत घातपाताचा कट आखण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून कोपर्शीच्या जंगलात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती पोलिस दलाला मिळाली होती. कोपर्शी तालुक्यातील भामरागड जंगल परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळत सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिस जंगल परिसरात पोहोचले होते. यावेळी नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
…तर लाडक्या बहिणींना दोन हजार देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
नक्षलवाद्यांनी सुरू केलेल्या गोळीबारात एक जवान किरकोळ जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू करताच पोलिसांच्या पथकाने नक्षलवाद्यांना शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 5 नक्षलवादी ठार झाले. परिसरात शोधमोहीम राबवली जात असून ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांना मिळालेले हे खूप मोठे यश मानले जात आहे.
धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ…
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम हे सोमवारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. भामरागडला त्यांचा दौरा नियोजित होता. अशातच भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांसोबत चकमक घडल्यामुळं आत्राम यांची सुरक्षा वाढवण्यात आलीय