12 नक्षलवाद्यांचा खात्मा; गडचिरोली पोलिसांना 51 लाखांचं बक्षीस, फडणवीसांची घोषणा

12 नक्षलवाद्यांचा खात्मा; गडचिरोली पोलिसांना 51 लाखांचं बक्षीस, फडणवीसांची घोषणा

Gadchiroli News : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी (Gadchiroli Naxal) आणि पोलिसांत झालेल्या चकमकीत पोलिसांनी (कमांडो जवान) 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. पोलिसांच्या या कारवाईची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 51 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. गडचिरोलीत आज सकाळी 10 वाजता एक ऑपरेशन सुरू करण्यात आले. वांडोली गावातील छत्तीसगड सीमेजवळ 12-15 माओवादी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर डीवाय एसपींच्या नेतृत्वाखाली 7 C60 पथक मोहिमेवर पाठवण्यात आले होते.

आषाढीनिमित्त ‘कलर्स मराठी’चा अनोखा उपक्रम; एक लाखाहून अधिक विद्यार्थांना दाखवला ‘इंद्रायणी’

लोकसभा निवडणुकीच्या आधीही गडचिरोलीतील कोरचोली आणि गांगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस आणि नक्षलवाद्यांत चकमक झाली. पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले. वांडोली गावाजवळ दुपारच्या सुमारास जोरदार चकमक सुरू झाली. संध्याकाळी उशिरापर्यंत 6 तासांहून अधिक काळ दोन्ही बाजून गोळीबार सुरू होता. दरम्यान, घटनेनंतर आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर 3 AK47, 2 INSAS, 1 कार्बाइन, 1 SLR यासह 7 ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

विशाळगड मोहिम फत्ते! ‘हिंदूपदपातशाह’ संभाजी महाराज छत्रपती, ‘स्वराज्य’कडून पोस्ट शेअर

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आधी कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र कॅडर मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील चुटीनटोला गावाजवळ (एसपीएस पेंढरीपासून 12 किमी पूर्वेला) MH CG बॉर्डरवर तळ ठोकून असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस आणि सुरक्षा दलाच्या तुकड्या 450 मीटर उंच टेकडीवर पोहचल्यानंतर त्या ठिकाणाहुन नक्षलवादी नूकतेच निघाले होते.

मी सांगितलं तसं झालं असतं तर निकाल वेगळा असता; विधान परिषद निवडणुकीवर पवारांचा खुलासा

डोंगरमाथ्यावरील शोधाच्या ठिकाणी एक मोठी नक्षलांची छावणी पोलिसांना आढळून आली होती. पोलिसांनी ही छावणी नष्ट केल्यानंतर शोध मोहिम राबवण्यात आली होती. त्यानंतर डोंगर आणि जंगलांचा फायदा घेऊन नक्षलवादी पळून गेले होते. ही शोध मोहिम अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऑपरेशन्स यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube