विशाळगड मोहिम फत्ते! ‘हिंदूपदपातशाह’ संभाजी महाराज छत्रपती, ‘स्वराज्य’कडून पोस्ट शेअर

विशाळगड मोहिम फत्ते! ‘हिंदूपदपातशाह’ संभाजी महाराज छत्रपती, ‘स्वराज्य’कडून पोस्ट शेअर

Sambhajiraje Chatrapati : विशाळगडावरील (Vishalgarth) अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांच्या नेतृत्वाखाली शिवभक्तांनी विशाळगड अतिक्रमण हटाव मोहिम फत्ते केलीयं. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली शिवभक्तांनी विशाळगडावर मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. त्यानंतर पोलिसांकडून शिवभक्तांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अतिक्रमण मोहिम फत्ते केल्यानंतर स्वराज्य संघटनेने संभाजी महाराजांना ‘हिंदूपदपातशाह’ अशी पदवी देऊन इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करण्यात आलंय. त्यामुळे आता नवीन वाद उफाळून येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

स्वराज्य संघटनेकडून इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली असून यामध्ये संभाजी महाराजांचा फोटो सोबतच छत्रपती शिवरायांचाही फोटो प्रकाशित करण्यात आलायं. या पोस्टरमध्ये संभाजी महाराज छत्रपती यांचा मोठा फोटो देत खाली हिंदूपदपातशाह अशी पदवी त्यांना देण्यात आलीयं. तसेच विशाळगड मोहिम फत्ते केल्याबद्दल संभाजीराजेंसह शिवभक्तांचं हार्दीक अभिनंदन, असाही उल्लेख करण्यात आलायं.

दरम्यान, स्वराज्य संघटनेने इन्स्टाग्रामवर पोस्ट व्हायरल करण्यात आल्यानंतर शेकडो नेटकऱ्यांनी या पोस्टला पसंती दिलीयं. तर काही नेटकऱ्यांनी कमेंटसुद्धा दिल्या आहेत. मात्र, ‘हिंदूपदपातशाह’चा हिंदूंचा सर्वोच्च राजा असा होतो, संभाजी महाराजांच्या फोटोला हा शब्दप्रयोग केल्याने नवीन वाद उफाळून येणार असल्याचं बोललं जात आहे.

पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना कोण प्रश्न विचारणार?
विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश असतानाही सरकारने अतिक्रमणावर कारवाई केली नाही. शिवभक्तांनी जेव्हा अतिक्रमण काढण्याची मोहिम हाती घेतली तेव्हा आता आरोप केले जात आहेत. अतिक्रमण काढण्याचे आदेश असताना पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकाऱ्यांना कोण प्रश्न विचारणार? असा संतप्त सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केलायं.

Fawad Khan: फवाद खानचा ‘भूल भुलैया 3’ मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन? निर्मात्याने थेटच सांगितले

खासदार शाहू महाराजांकडून तोडफोडीची पाहणी..
विशाळगडावरील अतिक्रमण तोडफोड प्रकरणी खासदार शाहू महाराज यांनी विशाळगडावर जात तोडफोड झालेल्या मशिदीची विचारपूस केलीयं. दरम्यान, संभाजीराजे छत्रपतीयांच्या नेतृत्वाखाली शिवभक्तांनी रविवारी विशाळगडावरील अतिक्रमणाची तोडफोड केल्याचं समोर आलं होत. त्यानंतर पोलिस प्रशासनाकडून 600 शिवभक्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज शाहू महाराजांनी वारसा जपत स्थानिक नागरिकांची विचारपूस करत पाहणी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube