जम्मू-काश्मीरात छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक; उद्योजक पुनीत बालन यांची घोषणा

जम्मू-काश्मीरात छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक; उद्योजक पुनीत बालन यांची घोषणा

Punit Balan News : जम्मू-काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं (Chatrapati Sambhaji Maharaj) भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा उद्योजक आणि पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन (Punit Balan News) यांनी केलीयं. डेक्कनमध्ये विश्व हिंदू मराठा संघाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पुनीत बालन बोलत होते.

“चौकशीला आले होते की पार्ट्या झोडायला?” डॉ. सापळे समितीच्या बिर्याणी मेजवाणीवर धंगेकरांचा संताप

पुनीत बालन म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांसारखा योद्धा या युगात झालेला नाही. भारतीय लष्करासमवेत मी काम काश्मीरमध्ये काम करतो. भारतीय सैन्यातील सैनिक युद्धाला जातात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे धैर्य, शौर्य, पराक्रम डोळ्यासमोर ठेवून लढत असतात. त्यांची ही प्रेरणा आपल्या जवानांना लढण्यासाठी मोठं बळ देत असते, काश्मीरस्थित शिवरायांचा पुतळा आहे, या ठिकाणी दररोज महाराजांच्या पुतळ्याची आरती केली जात असल्याचंही पुनीत बालन यांनी सांगितलं आहे.

शिवराय, छत्रपती संभाजी महाराज अखंड भारताचे आराध्य दैवत :
छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे अखंड भारत देशाचे आराध्य दैवत आहे. स्वराज्य निर्माण करुन त्यांनी घालून दिलेला आदर्श हा आपल्या सर्वांसाठीच पथदर्शी आहे. आजच्या युवा पिढीनेही याच मार्गाने वाटचाल केली पाहीजे यासाठी या दोन्ही राजांची स्मारकं गरजेची आहेत. म्हणूनच आम्ही काश्मीर खोऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचं पुनीत बालन यांनी स्पष्ट केलंय.

‘डॉ. तावरे एक कर्तव्यदक्ष अधिकारी..,’ ससूनमध्ये चिखल करणारं आमदार सुनील टिंगरेंचं ‘ते’ पत्र व्हायरल

तसेच लष्कराच्या सहकार्याने काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. महाराजांच्या या पुतळ्याकडे बघून जवानांना प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि भव्य स्मारक जम्मू-काश्मीरमध्ये उभारणार असल्याची घोषणाही बालन यांनी केलीयं.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याप्रमाणेच कश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा आणि स्मारक लष्कराच्या सहाय्याने आणि ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून विश्व हिंदू मराठा संघाला सोबत घेऊन उभारले जाणार आहे. महाराजांच्या पुढील वर्षीच्या जयंतीच्या आधी स्मारकाचे काम पूर्ण करू, अशी ग्वाही यावेळी पुनीत बालन यांनी दिलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज