स्वप्न सत्यात उतरलं! अहिल्यानगरीत चौथऱ्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला…
नगरकरांचं स्वप्न अखेर सत्यात उतरलं असून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण येत्या 16 डिसेंबरला होणार आहे.
Chatrapati sambhaji maharaj statue at ahilyanagar : मागील अनेक दिवसांपासून शहरातील प्रोफेसर चौक परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा (Chatrapati sambhaji maharaj statue) पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. अखेर अहिल्यानगरकरांचं हे स्वप्न आता सत्यात उतरलंय. येत्या 16 डिसेंबर रोजी सायंकाळी प्रोफेसर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या 15 फुटी कांस्य पुतळ्याचं अनावरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलीयं.
भाजपचं धक्कातंत्र कायम! भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारचे नितीन नबीन
प्रोफेसर चौकात मागील अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चौथरा उभं करण्याचं काम महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत होतं. प्रोफेसर चौक परिसर शहराचं महत्वाचं ठिकाण असून या चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी जोर धरु लागली होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी पुतळाही बसवण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच चर्चेत आला होता. त्यानंतर प्रशासनाने दखल घेत अखेर या चौकात पुतळा बसवण्यासाठी परवानगी दिली असून अखेर आज या चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा 15 फुटी कांस्य पुतळा थाटात उभा झाला आहे.
पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शशिकांत शिंदे स्पष्टच बोलले
दरम्यान, काल रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज यांचा 15 फुटी कांस्य पुतळ्याचं शहरात आगमन झाले. यावेळी सर्वच स्तरातील नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांचा वर्षावर करुन पुतळ्याचं स्वागत केलं. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने हा पुतळा चौथऱ्यावर बसवण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या देखरेखीखाली हा पुतळा बसवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरु होतं.
