जनआंदोलनापुढे महापालिका नमली! तपोवन परिसरात 15 हजार वृक्षांच्या लागवडीचा निर्णय…
नाशिकच्या तपोवन परिसरात 15 हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला असून आज वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
Tapovan : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन (Tapovan) परिसरातील झाडांची कत्तल करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला होता. या निर्णयाला वृक्षप्रेमींनी कडाडून विरोध दर्शवल्यानंतर आता महापालिका नमल्याचं दिसून येत आहे. तपोवन परिसरात आज मंत्री गिरीश महाजन आणि साधु महंतांच्या उपस्थितीत १५ हजार झाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीयं. त्यामुळे अखेर वृक्षप्रेमींच्या आंदोलनाला मोठं यश आलंयं.
नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला विरोध झाल्यानंतर आता वृक्षलागवडीचा महापालिकेने निर्णय घेतलायं. आज 15 हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. मंत्री गिरीश महाजन आणि पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हस्ते 15 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच
आखाड्यांचे प्रतिनिधी, स्थानिक साधू महंत आणि देशातील २८ राज्यांच्या साधू महंतांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
वृक्ष लागवडीसाठी काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील सरकारविरोधी भूमिका घेतली. त्याच दरम्यान मनसेकडून तपोवनमध्ये वृक्षतोडीविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आता शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान राज ठाकरे यांच्या मनसेने याविरूद्ध आंदोलन केलं होतं.
Devendra Fadnavis : पुढच्या दोन वर्षात 1 लाख 20 हजार सरकारी नोकऱ्या देणार, CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
नाशिककरांनी जी भूमिका घेतली आहे ती योग्य आहे आणि त्यामुळे मी नाशिकला गेलो होतो. नाशिकरांची भूमिका बघून आज सर्व अभिनेता, कवी, पर्यावरणप्रेमी, कॉमन मॅन हा झाडासाठी उभा राहिला आहे. पुर्नरोपण किंवा त्याच्या बदल्यात 10 झाडे लावायची ही निवड पळवाट आहे. यात खर्च खूप होणार आहे. उदाहरण, उजाड माळरानाच्या ठिकाणी झाडं लावली. तिथे झाडं नाहीत कराण तिथली माती चांगली नाही, तिथे कुंभ मेळावा भरवला पाहिजे असं अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले होते.
