आळंदी येथील विश्वकर्मा धर्मशाळा येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आळंदी येथील विश्वकर्मा धर्मशाळा येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
birth anniversary of Late Gopinath Munde : लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आळंदी येथील विश्वकर्मा धर्मशाळा येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ह.भ.प. रामेश्वर महाराज ढाकणे यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. कीर्तनानंतर तौरल इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ‘ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे भरत गीते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी गीते यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण वंचित व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी समर्पित केला. त्यांच्या विचारांवर आधारित वाटचाल आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. तरुणांनी उद्योग क्षेत्राकडे वळावे, कौशल्य विकासावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आयटी क्षेत्रात कार्यरत तरुण व ॲल्युमिनियम उद्योगावर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शशिकांत शिंदे स्पष्टच बोलले
या कार्यक्रमात कायन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजर अतुल खाडे यांनीही आपले अनुभव कथन केले. दहावीपासून ते आज व्यवस्थापक पदापर्यंतचा संघर्षमय प्रवास त्यांनी उलगडून सांगत, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेरणेमुळेच आपण या टप्प्यापर्यंत पोहोचलो असल्याचे नमूद केले. दुष्काळी भागातून आलेला युवक आज नामांकित कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे, हा प्रसंग युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..? शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला
त्यानंतर संगीत अलंकार शंकर गुट्टे यांच्या अभंगवाणीचा भक्तिरसपूर्ण कार्यक्रम पार पडला. या जयंती सोहळ्यास आळंदी, पिंपरी-चिंचवड, भोसरी, मोशी, दिघी परिसरातील माता-भगिनी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
