मुंडे घराण्यातून नव्या चेहऱ्याची राजकारणात एन्ट्री! गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या लेकीने भरला निवडणुकीसाठी अर्ज

Gopinath Munde’s Third Daughter Yashashri Munde files nomination : मुंडे घराण्यातून आणखी एक नवा चेहरा राजकारणात आलाय. यशश्री मुंडेंचा ( Yashashri Munde) राजकीय प्रवेश झाला आहे. पंकजा, प्रीतम मुंडे यांच्यानंतर आता यशस्वी मुंडे रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे आता बीडमध्ये (Beed) मुंडे कुटुंबाचा प्रभाव वाढत असल्याचं दिसतंय. यशस्वींच्या उमेदवारीमुळे (Gopinath Munde) चर्चेला उधाण आलंय.
यशस्वी मुंडे आता राजकीय क्षेत्रात
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडे आता राजकीय क्षेत्रात सक्रीय झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ (Maharashtra Politics) अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या सोबत माजी खासदार आणि बहीण डॉ. प्रीतम मुंडे यांनीही अर्ज सादर केला ( Vaidyanath Bank Election) आहे. या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळात विशेष लक्ष लागले आहे, कारण यशश्री मुंडेंच्या सहभागामुळे मुंडे घराण्याचा राजकीय प्रभाव अधिक बळकट होण्याची शक्यता आहे.
आमदाराचा मार, मंत्र्याची नोटांची बॅग; एकनाथ शिंदेंचा संताप, दोन्ही संजयला सुनावले खडेबोल…
एकूण 71 उमेदवारी अर्ज दाखल
मुंडे कुटुंबातील पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यानंतर आता यशश्री याही राजकारणाच्या मैदानात उतरत असल्याने त्यांचा प्रवेश विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. वैद्यनाथ बँकेच्या संचालकपदासाठी एकूण 71 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून ही निवडणूक 17 जागांसाठी होत आहे. 10 ऑगस्ट रोजी मतदान होईल आणि 12 ऑगस्टला मतमोजणी पार पडणार आहे.
विमानाने टेक ऑफ करताच अचानक..; एअर इंडियाच्या विमानाचा अपघात कसा झाला, अहवालात धक्कादायक माहिती
अमेरिकेत शिक्षण
यशश्री मुंडे यांचे शिक्षण अमेरिकेतील प्रतिष्ठित कॉर्नेल विद्यापीठात झाले आहे. जगभरातून फक्त 11% विद्यार्थ्यांना या विद्यापीठात प्रवेश मिळतो. यशस्वींना ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट’ या सन्मानाने गौरवण्यात आले होते. अद्याप राजकारणापासून दूर राहिलेल्या यशस्वी आता बँक निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच सक्रिय राजकारणात उतरल्या आहेत.