आमदाराचा मार, मंत्र्याची नोटांची बॅग; एकनाथ शिंदेंचा संताप, दोन्ही संजयला सुनावले खडेबोल…

Eknath Shinde Angry On Sanjay Shirsat And Sanjay Gaikwad : राज्यातील राजकारणात सध्या शिंदे (Eknath Shinde) गटाच्या दोन नेत्यांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेतील संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि मंत्री संजय शिरसाट यांच्याशी (Sanjay Shirsat) संबंधित दोन वेगवेगळ्या घटनांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली आहे. एकीकडे गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केली, तर दुसरीकडे शिरसाट एका व्हिडीओमध्ये नोटांनी भरलेल्या बॅगेसह दिसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच गटातील नेत्यांच्या बेशिस्त वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. शिंदेंनी संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांना जाब विचारत कडक शब्दांत ताकीद (Maharashtra Politics) दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पक्षाची प्रतिमा मलिन होईल, असे वर्तन अजिबात सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
“तुम्ही फ्यूल बंद केलं का?”, अपघाताआधी पायलट्सचा अखेरचा संवाद; RUN ऐवजी इंजिन CUTOFF कसे..
गायकवाडांची गुंडगिरी
संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये जेवण घेतले असता, त्यांना वरण खराब असल्याचे जाणवले. यामुळे ते संतप्त झाले आणि थेट कॅन्टीनमध्ये उतरून कर्मचाऱ्याला मला विष खायला घालतो का? असा सवाल करत मारहाण केली. त्यांनी पार्सल डाळीचा वास जबरदस्तीने कर्मचाऱ्याला घ्यायला लावला. त्यानंतर त्याला बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांच्या या वर्तनामुळे सामान्य कर्मचारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
T20 वर्ल्डकपमध्ये नव्या टीमची एन्ट्री; स्कॉटलंडला मागे टाकत इटलीचं तिकीट पक्कं…
शिरसाटांचा बॅग व्हिडीओ
दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत ते बेडवर बसून सिगारेट ओढत मोबाईलवर बोलताना दिसत आहेत, आणि त्यांच्या समोर मोठी बॅग ठेवलेली आहे. ही बॅग नोटांनी भरलेली असल्याचा दावा करण्यात आला. मात्र शिरसाट यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, बॅगेत पैसे नव्हे, कपडे होते. त्यांनी हा व्हिडीओ नियोजितपणे तयार करण्यात आल्याचा आरोपही केलाय.
शिंदेंची अडचण वाढली
गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे गटातील अनेक नेते चर्चेत आले आहेत. आमदार शंभूराज देसाई यांनीही नुकतीच विधिमंडळात आक्षेपार्ह भाषा वापरत विरोधकांना धमकी दिली होती. या तिन्ही घटनांमुळे शिंदेंवर गटावर नियंत्रण ठेवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. शिवसेनेचा शिंदे गट आता अशा वादग्रस्त कृतींमुळे अडचणीत आला असून, पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंना प्रतिमा राखण्यासाठी कठोर पावले उचलावी लागत आहेत. या प्रकारांमुळे राजकीय वर्तुळात शिंदेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे.