T20 वर्ल्डकपमध्ये नव्या टीमची एन्ट्री; स्कॉटलंडला मागे टाकत इटलीचं तिकीट पक्कं…

T20 वर्ल्डकपमध्ये नव्या टीमची एन्ट्री; स्कॉटलंडला मागे टाकत इटलीचं तिकीट पक्कं…

Italy Qualified for ICC T20 World Cup : सगळ्या जगाला आश्चर्याचा धक्का देत इटलीच्या संघाने टी 20 वर्ल्डकपसाठी (Italy) क्वालिफाय केले आहे. फुटबॉलचा बालेकिल्ला (ICC T20 World Cup) आणि चार वेळेसच्या वर्ल्ड चॅम्पियन इटलीने आता क्रिकेट विश्वात दमदार (Cricket News) पाऊल ठेवले आहे. इटलीचा संघ पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी इटलीने क्वालिफाय केले आहे. इटलीने युरोपियन क्वालिफायरमध्ये चमकदार कामगिरी करत टी 20 वर्ल्डकपमध्ये एन्ट्री घेतली आहे. (Italy Qualified for ICC T20 World Cup)

फुटबॉल जगतात दबदबा राखणाऱ्या इटलीने चार वेळा विजेतेपद मिळवलं आहे. पण मागील दोन वर्ल्डकपमध्ये इटलीला क्वालिफाय करता आलेले नाही. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपसाठी सुद्धा अद्याप इटलीचा संघ पात्र ठरलेला नाही. फुटबॉलमध्ये निराशाजनक कामगिरी होत असताना क्रिकेटमध्ये मात्र इटलीच्या संघाने दमदार एन्ट्री घेतली आहे.

IND vs ENG पहिली कसोटी, IPL मध्ये धुमाकूळ घालणारा खेळाडू करणार भारतासाठी डेब्यू; पहा प्लेइंग इलेव्हन

मागील काही दिवसांपासून आयसीसी टी 20 वर्ल्डकप युरोपियन क्वालिफायरमध्ये इटालियन टीमने दुसरा क्रमांक मिळवला आणि वर्ल्डकपसाठी क्वालिफाय केले. क्वालिफायर फेरीच्या आपल्या शेवटच्या सामन्यात इटलीला नेदरलँड्स विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. परंतु तरीही नेट रनरेटच्या आधारावर इटलीने दुसरा क्रमांक कायम राखला. इतकेच नाही तर टी 20 वर्ल्डकपचे तिकीटही फायनल केले.

इटलीने या टुर्नामेंट मध्येचारपैकी दोन सामने जिंकले आणि 0.612 या नेट रनरेटसह यश मिळवले. इटलीने या टुर्नामेंटमध्ये स्कॉटलंडचा पराभव करत सर्वात मोठा विजय मिळवला. इटलीने प्रथमच कोणत्याही फॉरमॅटमध्ये स्कॉटलंडचा पराभव केला. यानंतर झालेल्या अखेरच्या सामन्यात इटलीने नेदरलँड्सला 15 ओव्हरसच्या आत विजय मिळवण्यापासून रोखले.

तरीही इटली आणि नेदरलँड्स या दोन्ही संघानी वर्ल्डकपसाठी क्वालिफाय केले. या टुर्नामेंटमध्ये नेदरलँड्सने (Netherlands) पहिला क्रमांक पटकावला. यंदा स्कॉटलंडला (Scotland) मात्र टी 20 वर्ल्डकपसाठी क्वालिफाय करता आले नाही. स्कॉटलंडचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले.

IND vs ENG कसोटी मालिका कधी आणि कुठे पाहता येणार? एका क्लीकवर जाणून घ्या सर्वकाही

follow us
  • fb
  • instagram
  • youtube