IND vs ENG पहिली कसोटी, IPL मध्ये धुमाकूळ घालणारा खेळाडू करणार भारतासाठी डेब्यू; पहा प्लेइंग इलेव्हन

IND vs ENG पहिली कसोटी, IPL मध्ये धुमाकूळ घालणारा खेळाडू करणार भारतासाठी डेब्यू; पहा प्लेइंग इलेव्हन

IND vs ENG  :  आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत असून या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानात खेळला जाणार आहे. इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्सने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताकडून या सामन्यात साई सुदर्शनला (Sai Sudarshan) पदार्पणाची संधी मिळाली आहे. साईने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती. नुकतंच भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान होणाऱ्या मालिकेचा नाव बदलून अँडरसन – तेंडूलकर ट्रॉफी करण्यात आला आहे.

करुण नायरचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. 2017 नंतर भारतासाठी तो पहिल्यांदाच कसोटी खेळताना दिसणार आहे. तर दुसरीकडे भारताने मोठा निर्णय घेत नितीश रेड्डी, कुलदीप यादव सारखे खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले आहे. भारतीय डावाची सुरुवात यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल करणार आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शन फलंदाजीला येणार आहे. चौथ्या क्रमांकावर कर्णधार शुभमन गिल पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंत आणि सहाव्या क्रमांकावर करुण नायर फलंदाजीला येणार आहे.

‘हृतिक रोशन आणि एनटीआर यांच्यातील अ‍ॅक्शनसाठी स्वतःला पूर्णपणे बुडवून टाकले; अयान मुखर्जींचा मोठा खुलासा

भारताची प्लेइंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल, ऋषभ पंत, करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube