भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी वनडे, जसप्रीत बुमराह बाहेर; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

IND VS ENG 3rd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना लंडनमधील

IND VS ENG 3rd ODI

IND VS ENG 3rd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार असून भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने मोठा निर्णय घेत संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला बाहेर ठेवले आहे.

ही मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत असल्याने हा सामना निर्णायक ठरणार आहे. तर दुसरीकडे आज भारतीय संघाकडे इतिहास घडवण्याची संधी आहे. भारताने या मैदानावर गेल्या 22 वर्षात एकही सामना जिंकलेला नाही.

भारत ‘प्लेइंग इलेव्हन’

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ईशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.

सर्वोच्च न्यायालय गुलाम, संविधान कुठे उरले? फुटीर खासदारांच्या गटाला मंजुरी मिळताच संजय राऊतांचा हल्लाबोल

इंग्लंड ‘प्लेइंग इलेव्हन’

बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, गस ॲटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टोंग.

follow us