सर्वोच्च न्यायालय गुलाम, संविधान कुठे उरले? फुटीर खासदारांच्या गटाला मंजुरी मिळताच संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut On Om Birla : ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या
Sanjay Raut On Om Birla : ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सहा खासदारांच्या गटाला शिवसेनेत विलीनीकरणासाठी अधिकृत मान्यता लोकसभा सचिवालयाने आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिल्याने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.
तर आता या मुद्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माध्यमांशी बोलतानात खासदार राऊत यांनी देशातील न्यायव्यवस्था आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशात लोकशाहीवर बलात्कार करुन हत्या होत असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयही (Supreme Court) गुलाम आहे. सर्वोच्च न्यायालयाने 40 आमदारांच्या आमच्या प्रलंबित प्रकरणाचा निकला दिला असता तर वारंवार देशात पक्ष फोडले गेले नसते. देशात लोकशाहीवर बलात्कार करुन हत्या होत आहे. संविधान कुठे उरले आहे? दहाव्या परिशिष्टात कुठल्याही पक्षफुटीला किंवा विलीनीकरणाला मान्यता नाही. मग लोकसभा अध्यक्षांनी 6 फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता कशी दिली? असं माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणजे आचार्य विनोबा भावे नाहीत
तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर देखील जहरी टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणजे आचार्य विनोबा भावे नाहीत असं संजय राऊत म्हणाले.
माध्यमांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे म्हणजे आचार्य विनोबा भावे नाहीत. दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे तर ते आचार्य विनोबा भावे नाहीत. ते बोलतील ते सत्य आहे आणि नीतिमत्तेचे आहे असे नाही. ते मशालीवर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50 कोटींना विकत घेतले आहे. मशाल चिन्हावर निवडून आलेले लोक निर्लज्ज आणि गद्दार आहेत. ते चांगले की वाईट हे सोडून द्या, हे गद्दार आहेत. यात कोणते शौर्य,नीतिमत्ता आणि लोकशाही आहे? चांगले आणि वाईट याचे उत्तर त्यांनी द्यावे.
‘ही दुसरी स्वातंत्र्य चळवळ’, संसदेवरील मोर्चा होणारच! रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा संदेश
आम्ही त्यांना मशाल चिन्हावर निवडून आणले. उद्धव ठाकरे साहेबांना मते पडली आहेत, मशालीला मते पडली आहेत, तुमच्या चोरलेल्या धनुष्यबाणाला नाही असं देखील यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले.