उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; सहा खासदारांच्या गटाला शिवसेनेत विलिनीकरणास मान्यता

Uddhav Thackeray :  शिवसेना ठाकरे गटातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सहा फुटीर खासदारांना शिवसेनेत विलिनीकरणास

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray :  शिवसेना ठाकरे गटातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सहा फुटीर खासदारांना शिवसेनेत विलिनीकरणास लोकसभा सचिवालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. मान्सून अधिवेशनापूर्वी फुटीर खासदारांच्या गटाला शिवसेनेत विलिनीकरणास लोकसभा सचिवालयाकडून मंजुरी देण्यात आल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

लोकसभा सचिवालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता या प्रकरणात शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून काय निर्णय घेण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ऑपरेशन टायगर राबवत शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार फोडले होते.

ठाकरेंची साथ सोडणारे खासदार कोण ?

ऑपरेशन टायगर (Operation Tiger) अंतर्गत यवतमाळ – वाशीमचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, मुंबई उत्तर-पूर्वचे खासदार संजय दिना पाटील, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, हमसफर या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ‘लघुपट’ चा पुरस्कार-

ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने एकनाथ शिंदे यांच्या खासदारांची संख्या 13 झाली आहे. एनडीएमध्ये महाराष्टातून सर्वात जास्त खासदार असणारा पक्ष आता एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष असणार आहे. तर ठाकरे गटाची खासदारांची संख्या 9 वरून 3 वर आली आहे.

follow us