श्रावणी कुदळेने नीटच्या पेपरमध्ये घडवला इतिहास; देशात पाचवी तर मुलींमध्ये प्रथम, मोबाईलला दूर ठेवत केला अभ्यास!

NEET Re-Exam 2026 Result : नीट फेरपरिक्षेच्या निकालात पुणे जिल्ह्यातील बारामती येथील श्रावणी कुदळे हिने उल्लेखनीय यश संपादन करत देशभरात

Shravani1
NEET Re-Exam 2026 Result : नीट फेरपरिक्षेच्या निकालात पुणे जिल्ह्यातील बारामती येथील श्रावणी कुदळे हिने उल्लेखनीय यश संपादन करत देशभरात पाचवा क्रमांक, तर मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. श्रावणीने 720 पैकी तब्बल 710 गुण मिळवत महाराष्ट्राचं नाव देशभरात उज्ज्वल केलं आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या मूळ NEET परीक्षेत तिला 715 गुण मिळाले होते. मात्र, पेपरफुटी प्रकरणामुळे फेरपरीक्षा घ्यावी लागल्यानंतरही तिने खचून न जाता पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. नीट पेपर परीक्षेत कामगिरीबाबत लेट्सअप मराठीशी (Letsupp Marathi) संवाद साधत श्रावणी कुदळे हिने यशाचा सिक्रेट शेअर केला.

नीट पेपर प्रकरणात राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल

पेपरफुटीनंतरही हार मानली नाही
NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांप्रमाणे श्रावणीलाही पुन्हा परीक्षा द्यावी लागली. पहिल्या परीक्षेत अधिक गुण मिळूनही फेरपरीक्षा द्यावी लागल्याने अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली होते. मात्र, श्रावणीने या परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले. निराश न होता तिने पुन्हा अभ्यास सुरू केला आणि स्वतःवरील विश्वास कायम ठेवत देशातील टॉप विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले.

NEET Result : नीट परीक्षा निकाल, पुन्हा लातूर पॅटर्नची चर्चा; 1500 विद्यार्थी MBBS होणार?

नववीपासूनच नीटची परिक्षा देण्याचं स्वप्न
श्रावणीने नीटची परिक्षा देण्याचं स्वप्न अगदी नववी इयत्तेत असतानाच निश्चित केलं होतं. त्यानंतर तिने नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास सुरू केला. केवळ परीक्षेच्या काही महिन्यांपूर्वी नव्हे, तर तीन वर्षे सातत्याने मेहनत घेतल्यामुळेच हे यश मिळाल्याचं ती सांगते. तिच्या मते, मोठं ध्येय गाठण्यासाठी लवकर सुरुवात आणि सातत्यपूर्ण मेहनत या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत.

ही तर दहशतवाद्यांची बी-टीम; नीट’प्रश्‍नी आंदोलनांवर काय म्हणाले शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान?

मोबाईलपासून कायम दूर राहण्याचा निर्णय
आजच्या काळात विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासापेक्षा मोबाईलकडे अधिक असते. सोशल मीडिया, गेम्स आणि इतर डिजिटल माध्यमांमुळे अभ्यासावर परिणाम होतो, याची जाणीव श्रावणीला होती. त्यामुळे तिने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. नीटची तयारी सुरू केल्यापासून तिने स्वतःसाठी अजूनही एक मोबाईलसुद्धा विकत घेतला नाही. श्रावणी सांगते की, “मोबाईल नसल्यामुळे अभ्यासात व्यत्यय येत नाही. वेळ वाया जात नाही आणि पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करता येते.” तिने दररोज सलग सहा तास एकाग्रतेने अभ्यास करण्याची सवय लावली होती. अभ्यासाची गुणवत्ता आणि सातत्य यामुळेच तिला हे यश मिळाल्याचे ती सांगते.

‘ही दुसरी स्वातंत्र्य चळवळ’, संसदेवरील मोर्चा होणारच! रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा संदेश

जिल्हा परिषद शाळेतून देशातील टॉपरपर्यंतचा प्रवास
श्रावणीचे चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतरचे शिक्षण तिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board) अभ्यासक्रमातून शिक्षण पूर्ण केले. आजही अनेकांच्या मनात स्पर्धा परीक्षांमध्ये केवळ सीबीएसई (CBSE) किंवा आयसीएसई (ICSE) बोर्डातील विद्यार्थीच यशस्वी होतात, असा समज आहे. मात्र, श्रावणीने आपल्या यशातून हा समज चुकीचा असल्याचे सिद्ध केले आहे. ती म्हणते, “महाराष्ट्र बोर्डातील विद्यार्थी कोणतीही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊ शकतात. यश बोर्डावर अवलंबून नसून मेहनत, योग्य नियोजन आणि सातत्यावर अवलंबून असते.”

FIFA World Cup 2026 Final : अर्जेंटिना की स्पेन कोण मारणार बाजी; महामुकाबला कधी, कुठे आणि कसा पाहायचा ?

श्रावणीने विद्यार्थ्यांना दिला यशाचा मंत्र
सुरुवातीपासून नियोजनबद्ध अभ्यास करा.
मोबाईल आणि सोशल मीडियापासून शक्य तितके दूर राहा.
अभ्यासाची वेळ हळूहळू वाढवत न्या.
नियमित अभ्यासाची पुनरावृत्ती करा.
मॉक टेस्ट आणि प्रश्नपत्रिका सोडवा.
कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
तिच्या मते, सकारात्मक विचार आणि एकाग्रता यामुळे परीक्षेच्या वेळी तणाव कमी होतो आणि प्रश्नपत्रिका अधिक आत्मविश्वासाने सोडवता येते.
अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान
पेपरफुटीसारख्या प्रतिकूल परिस्थितीनंतरही श्रावणीने जिद्द, मेहनत आणि संयमाच्या जोरावर देशात अव्वल स्थान मिळवले आहे. मोबाईलपासून दूर राहून, सातत्यपूर्ण अभ्यास आणि स्पष्ट ध्येय यांच्या बळावर मिळवलेले हे यश लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. तिची कहाणी सांगते की, योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते.

 

follow us