NEET Result : नीट परीक्षा निकाल, पुन्हा लातूर पॅटर्नची चर्चा; 1500 विद्यार्थी MBBS होणार?
Latur Pattern NEET : नीट पेपर परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा देखील लातूरच्या पॅटर्न ने दमदार कामगिरी केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात
NEET Result : नीट पेपर परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा देखील लातूरच्या पॅटर्न ने दमदार कामगिरी केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूनमधील काही जणांना अटक करण्यात आल्याने या परीक्षेच्या निकालावर परिणाम होणार असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती मात्र यंदा देखील लातूर पॅटर्न चालला असून विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर बाजी मारली आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या निकालानंतर (NEET Result) राजर्षी शाहू महाविद्यालयातून 450 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण लातूरमधून 1500 विद्यार्थी एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
माहितीनुसार, यंदा राजर्षी शाहू महाविद्यातील 1400 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी 600 हून अधिक गुणांचा टप्पा पार केला आहे. तर 530 पेक्षा जास्त अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील 200 पेक्षा जास्त असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नीट पेपर प्रकरणात राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल-
नीट पेपरफुटी प्रकरणात लातूर मधील काही जणांना अटक करण्यात आल्याने प्रामणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेंचे वातावरण होते. मात्र आज जाहीर करण्यात आलेल्या निकालानंतर लातूरच्या विद्यार्थ्यांनी सर्व बदनामीचे डाग धुऊन काढले आहेत.