रामरक्षा म्हणणं हे तुमचं काम असेल, पण रामरक्षा करणं हे आमच्या रामभक्तांचं काम

Uddhav Thackeray On Sonam Wangchuk : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रामरक्षा पठण कार्यक्रमात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On Sonam Wangchuk

Uddhav Thackeray On Sonam Wangchuk : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रामरक्षा पठण कार्यक्रमात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. “रामरक्षा म्हणणं हे तुमचं काम असेल, पण रामरक्षा करणं हे आमच्या रामभक्तांचं काम आहे. आम्ही रामरक्षक आहोत,” असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले. तसेच, सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईवरूनही केंद्र सरकारवर टीका करत भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नागपूरमधील रामनगर येथील राम मंदिरात (Ram Mandir) आयोजित रामरक्षा पठण कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज आपण एका नव्या लढ्याची सुरुवात करत आहोत. काही वर्षांपूर्वी हिंदू समाजाने राम मंदिर उभारणीचा लढा यशस्वी केला. मात्र आता मंदिर उभं राहिलं असलं तरी त्या मंदिराच्या रक्षणासाठी नवा संघर्ष सुरू करण्याची वेळ आली आहे.” कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी मंदिराचे विश्वस्त, गुरूजी आणि कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी झालेल्या शिवसैनिकांचे आभार मानले.

एखाद्या अतिरेक्याला पकडावे तसे सोनम वांगचुक यांना पकडल- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, आज सकाळी नागपूरमध्ये आलो तेव्हा पहिली बातमी कळली ती, सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना पकडलंय. एखाद्या अतिरेक्याला पकडावे तसे सोनम वांगचुक  यांना पकडले. तिकडे दीपकेवर शाईफेक झाली. नवा लढा मंदिराच्या रक्षणासाठी- उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर आंदोलनाचा उल्लेख करत म्हटले की, मंदिर उभारण्यासाठी आंदोलन केलं, मंदिर जरूर उभं राहिलं, पण नवा लढा मंदिराच्या रक्षणासाठी उभा करावा लागतोय.

उन्नत महामार्गांसाठी अजितदादांचे सहकार्य; मंत्री नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा –

भागवतांना प्रश्न विचारू इच्छितो की, मंदिरं लुटली जात आहेत, पेपर फुटतायत, मारहाण होतेय हेच तुमचे हिंदुराष्ट्र आहे का?

ठाकरे म्हणाले की, प्रभू श्रीरामाला विचारतोय की, ज्या भाजपने तुझ्या नावावरती सत्ता मिळवली त्या भाजपच्या अंगात श्रीरामाच्या ऐवजी सैतानाचा संचार झालाय की काय? नागपूर हे संघाचे मुख्यालय आहे. मी भागवतांना प्रश्न विचारू इच्छितो की, मंदिरं लुटली जात आहेत, पेपर फुटतायत, मारहाण होतेय हेच तुमचे हिंदुराष्ट्र आहे का? भागवत तुम्ही याच वर्षी फेब्रुवारीत म्हणाला होतात की, या देशातील मुस्लिमसुद्धा हिंदू आहेत.

follow us