FIFA World Cup 2026 Final : अर्जेंटिना की स्पेन कोण मारणार बाजी; महामुकाबला कधी, कुठे आणि कसा पाहायचा ?

FIFA World Cup 2026 Final : फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात आज अर्जिंटिना आणि स्पेन भिंडणार आहे. सोमवारी रात्री होणाऱ्या

FIFA World Cup 2026 Final

FIFA World Cup 2026 Final : फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात आज अर्जिंटिना आणि स्पेन भिंडणार आहे. सोमवारी रात्री होणाऱ्या या महामुकाबल्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. गतविजेता अर्जेंटिना आणि माजी विजेता स्पेन यांच्यात होणारा हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे. पुरुष आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच युरोप आणि दक्षिण अमेरिकेचे विद्यमान विजेते या खेळाच्या सर्वात मोठ्या मंचावर एकमेकांशी भिडणार आहेत.

अर्जेंटिना इतिहास घडवणार ?

अर्जेंटिनाने (Argentina) हा अंतिम सामना जिंकला, तर सलग चार मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा (कोपा अमेरिका 2021, विश्वचषक 2022, कोपा अमेरिका 2024 आणि विश्वचषक 2026) जिंकणारा तो जगातील पहिला देश ठरेल. दुसरीकडे, युरो 2024  विजेता स्पेन आपल्या पहिल्या विश्वचषक विजेतेपदानंतर 16 वर्षांनी दुसऱ्या विजेतेपदावर डोळा ठेवून आहे. मार्च 2024 पासून स्पेन (Spain)  सलग 37 सामन्यांत अपराजित राहिला आहे. रविवारी आणखी एक विजय त्यांना आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक काळ अपराजित राहणारा संघ बनवेल.

तर दुसरीकडे अंतिम सामन्यासाठी फिफाकडून देखील जोरदार तयारी करण्यात आली आहे. फिफाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सामन्याच्या सुरुवातीच्या 90 मिनिटे आधी एक भव्य समारंभ होईल, ज्यामध्ये हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझ, इंटरनेट सेन्सेशन ‘आयशोस्पीड’ (IShowSpeed) आणि पॉप स्टार पोस्ट मॅलोन यांची सादरीकरणे असतील. याव्यतिरिक्त, पहिल्या हाफनंतर एक नेत्रदीपक ‘हाफटाइम शो’ होईल. या शोमध्ये प्रसिद्ध रॉक बँड ‘कोल्डप्ले’चा ख्रिस मार्टिन तसेच जस्टिन बीबर, मॅडोना, शकीरा आणि दक्षिण कोरियाचा बॉय बँड ‘बीटीएस’ (BTS) हे कलाकार स्टेडियममधील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज असतील.

भारतात हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहावा?

हा सामना न्यूयॉर्कमधील मेटलाइफ स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी, हा सामना सोमवारी मध्यरात्री १२:३० वाजता (IST) सुरू होईल. सामन्याचे पंचाचे काम पाहण्याची जबाबदारी स्लोव्हेनियाचे अनुभवी रेफरी स्लाव्हको विन्चिच यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सामना संपल्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः विजेत्या संघाला फिफा विश्वचषक ट्रॉफी प्रदान करतील.

भारतीय प्रेक्षक ‘Unite8 Sports 1’, ‘Unite8 Sports 1 HD’, ‘Unite8 Sports 2’ आणि ‘Unite8 Sports 2 HD’ या टीव्ही चॅनेलवर याचे थेट प्रसारण पाहू शकतात. तसेच, ज्यांना हा सामना मोफत पाहायचा आहे, ते ‘दूरदर्शन स्पोर्ट्स’वर याचा आनंद घेऊ शकतात. ZEE5 ॲप आणि वेबसाइटवर इंग्रजी, हिंदी, बंगाली आणि मल्याळम भाषांमध्ये याचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) उपलब्ध असेल.

follow us