अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं; तब्बल 16 वर्षांनी स्पेन ठरला जगज्जेता

स्पेनने पहिल्या हाफमध्ये सुरुवातीपासूनच आक्रमक सुरूवात केली. तसंच अर्जेंटीनाला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला.

FIFA 2026

FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम (FIFA) सामनन्यात स्पेनने बाजी मारली. अर्जेंटीनाला सलग दुसऱ्यांदा जेतेपदापासून रोखलं. या सामन्यात पहिल्या 90 मिनिटांच्या खेळात एकही गोल झाला नाही. अतिरिक्त 30 मिनिटांच्या पहिल्या हाफमध्ये काही घडलं नाही. पण दुसऱ्या 15 मिनिटांच्या हाफमध्ये स्पेनने गोल मारला आणि 1-0 ने सरशी घेतली. 106 व्या मिनिटाला टोरेसने अंतिम सामन्यातील पहिला गोल करून स्पेनला आघाडी मिळवून दिली. अखेर स्पेनने 16 वर्षांचा दुष्काळ दूर करून दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं आहे. स्पेनने यापूर्वी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता.

स्पेनने पहिल्या हाफमध्ये सुरुवातीपासूनच आक्रमक सुरूवात केली. तसंच अर्जेंटीनाला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. पाचव्या मिनिटाला राइट विंगच्या लमीन यमालने डॅनी ऑल्मोसह एक संधी साधली. यमालने गोल मारण्याचा प्रयत्न केला पण गोलकीपर मार्टिनेजने अडवला. यमालने सुरूवातीला गोल करण्याच्या दोन संधी गमावल्या. 24व्या मिनिटाला हायड्रेशन ब्रेक होण्यापूर्वी स्पेनने आक्रमक खेळ दाखवला. 39व्या मिनिटाला स्पेनने आणखी एक संधी गमावली.

भारतीय बॅडमिंटनसाठी अभिमानाचा क्षण; पी. व्ही. सिंधू जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय, सुपर 750 किताबावरही कोरले नाव

अर्जेंटीनाला 41 व्या मिनिटाला धक्का बसला. अर्जेंटिनाचा सेंटर-बॅक (डिफेंडर) लिझांड्रो मार्टिनेझने ओयार्झाबालवर फाऊल केला. त्याचा दंड म्हणून यलो कार्ड मिळालं. पहिला हाफ संपण्याच्या दोन मिनिटापूर्वी अर्जेंटीनाला आणखी एक धक्का बसला. सेंटर-बॅक मार्टिनेझ दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. त्यामुळे 44 व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पहिला बदल करण्यास भाग पडले.अनुभवी सेंटर-बॅक निकोलस ओटामेंडीने मार्टिनेझची जागा घेतली. पण पहिला हाफ 0-0 ने बरोबरीत सुटला.

दरम्यान, दुसऱ्या हाफच्या पहिल्याच मिनिटात स्पेनने संधी साधली. पण बायनाच्या शॉटमध्ये तितका जोर नसल्यामुळे थेट गोलकीपरच्या हातात गेला. अर्जेंटिनाच्या लिआंद्रो पारेडेसने हलकेच धक्का दिल्यावर स्पेनचा कर्णधार रोड्री खाली पडला. यामुळे अर्जेंटीनाचे खेळाडू संतापले आणि त्यांनी रोड्रीवर जास्तच प्रदर्शन करत असल्याचा आरोप केला.डॅनी अल्मो कर्णधाराला उचलण्यासाठी आला, तेव्हा पारेडेसने त्याला रागाने खाली ढकललं. त्यानंतर इतर स्पॅनिश खेळाडू धावून आले, पण पंचांनी पारेडेसला यलो कार्ड दाखवलं. दुसऱ्या हाफमध्ये स्पेनने अनेक हल्ले चढवले, पण ते सर्व अयशस्वी ठरले.

खेळाची 90 मिनिटे पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त 4 मिनिटं देण्यात आली. अतिरिक्त वेळेच्या खेळात मिडफिल्डर एन्झो फर्नांडिसला रेड कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे त्याची अंतिम मोहीम संपुष्टात आली. अर्जेंटिना आता 10 खेळाडूंसह खेळली. 90 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. यात 15-15 मिनिटांचे दोन हाफ खेळले गेले. 15 मिनिटांच्या पहिल्या हाफमध्ये एकही गोल झाला नाही. पण दुसऱ्या हाफमध्ये स्पेनने आघाडी घेतली आणि गोल मारला. टोरेसने गोल मारला. या गोलची बरोबरी काही अर्जेंटीनाला साधता आली नाही.

follow us