‘ही दुसरी स्वातंत्र्य चळवळ’, संसदेवरील मोर्चा होणारच! रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा संदेश

भयमुक्त, अन्यायमुक्त भारतासाठी ही दुसरी स्वातंत्र्य चळवळ. पेपर लीकसारख्या अन्यायापासून आणि बेकायदेशीर अटकेपासून स्वातंत्र्य पाहीजे.

SONAM 1

Sonam Wangchuk’s Message from Hospital, Parliament March Will Go Ahead as Planned :जंतर-मंतर येथे उपोषणादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केलेले पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक(Sonam Wangchuk) यांनी रुग्णालयातूनच आंदोलनकर्त्यांना महत्त्वाचा संदेश पाठवत 20 जुलै रोजी होणाऱ्या संसदेवरील मोर्चाला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. नीट पेपरफुटी (NEET Paper Leak) प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वांगचुक उपोषणाला बसले होते.

सोनम वांगचुक यांचा उपचारास नकार; सफदरगंजच्या डॉक्टरांकडून हेल्थ बुलेटीन जारी

पोलिसांनी उपोषणस्थळावरून हलवले

18 जुलै रोजी जंतर-मंतर (Jantar Mantar)येथे उपोषण सुरू असताना पोलिसांनी वांगचुक यांना ताब्यात घेत बळजबरीने दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, आंदोलनकर्त्यांनी याला लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर दडपशाही केल्याता आरोप केला आहे. वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर 20 जुलै रोजी संसद भवनावर निघणारा मोर्चा पुढे ढकलला जाईल का, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु, वांगचुक यांच्या संदेशानंतर आंदोलनकर्त्यांनी मोर्चाच्या तयारीला आणखी वेग दिला आहे.

धर्मेंद्र प्रधानांसह मोदींनीही राजीनामा द्यावा; आमरण उपोषणाची घोषणा करत अभिजीत दिपके आक्रमक

‘ही भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ’

रुग्णालयातून आपल्या पत्नीमार्फत पाठवलेल्या हस्तलिखित संदेशात सोनम वांगचुक यांनी लिहिले, “20 जुलै… स्वातंत्र्यासाठी दुसरे आंदोलन, भयमुक्त भारत आणि अन्यायमुक्त भारत. पेपर लीकसारख्या अन्यायापासून स्वातंत्र्य आणि बेकायदेशीर अटकेच्या भीतीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ही भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ आहे. संसदेवर मोर्चा काढा. कृपया हे आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी करा.” या संदेशामुळे आंदोलनकर्त्यांचा उत्साह वाढला असून, संसदेवरील मोर्चा (Parliament March) नियोजित वेळेनुसार काढण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता आवाज उठवणार; अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा सोनम वांगचुकांच्या उपोषणाला पाठिंबा

कॉक्रोच जनता पार्टीची भूमिका

कॉक्रोच जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हे आंदोलन कोणत्याही एका व्यक्तीसाठी नसून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, दोषींना कठोर शिक्षा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मजबूत परीक्षा प्रणाली उभी करण्याच्या मागण्या आंदोलनातून केल्या जात आहेत. पार्टीने आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे आणि संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, 20 जुलैच्या मोर्चात देशभरातून विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खलील शेख आत्महत्या प्रकरणात रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढल्या; अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव!

प्रकृतीबाबत रुग्णालयाची माहिती

सफदरजंग रुग्णालयाच्या (Safdarjung Hospital) वैद्यकीय माहितीनुसार, दीर्घकाळ उपोषणामुळे सोनम वांगचुक यांच्यात डिहायड्रेशनची लक्षणे दिसून आली आहेत. त्यांच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाणही कमी होत असल्याने डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचे रुग्णालयाने सांगितले. डॉक्टरांनी काही वैद्यकीय उपचारांची शिफारस केली असली, तरी वांगचुक यांच्या कुटुंबीयांनी अद्याप त्यासाठी संमती दिली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

बंगालच्या उपसागरातील अनुकूल परिस्थितीचा परिणाम, राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज

वांगचुक यांच्या पत्नीचा गंभीर आरोप

दुसरीकडे, सोनम वांगचुक यांच्या पत्नीने सफदरजंग रुग्णालयाच्या उपचारांबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेत वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “रुग्णालयाने आम्हाला सांगितले की, वांगचुक यांच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी 2.9 पर्यंत घसरली असून ती जीवघेणी ठरू शकते. मात्र, सार्वजनिक आरोग्य बुलेटिनमध्ये हा आकडा नमूद न करता केवळ ‘पोटॅशियमची पातळी कमी होत आहे’ असा उल्लेख करण्यात आला. स्वतंत्र प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत पोटॅशियमची पातळी 3.5 आढळली, जी सामान्य मर्यादेत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयाने दिलेल्या माहितीवर आमचा विश्वास राहिलेला नाही.”

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात उच्च न्यायालयाचा दणका; रमेश म्हात्रे यांचा जामीन स्थगित

20 जुलैकडे देशाचे लक्ष

सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे आणि त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर निर्माण झालेल्या वादामुळे आता 20 जुलै रोजी होणाऱ्या संसदेवरील मोर्चाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी जोर धरत आहे, तर दुसऱ्या बाजूला आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे संसदेवरील हा मोर्चा केवळ नीट पेपरफुटी प्रकरणापुरता मर्यादित न राहता, लोकशाही हक्क, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि प्रशासनाच्या भूमिकेवरही मोठी चर्चा घडवून आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us