त्याचं मुंडक छाटून माझ्याकडं आणा; नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग, बीडच्या परळीत जीवघेणा हल्ला

या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परळी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.

News Photo   2026 07 19T142246.168

बीड जिल्ह्यातील परळी येथून पुन्हा एकदा धक्कादायक (Beed) बातमी समोर आली आहे. येथे जुन्या भांडणाचा राग आणि राजकीय वैमनस्यातून एका 29 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. एका हॉटेलवर चहा पीत असताना अभिजीत नागेश कांबळे या तरुणाला लोखंडी रॉड आणि कोयत्याने बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्याचे दोन्ही हात, पाय फ्रॅक्चर झाले असून तो गंभीर जखमी आहे. त्याच्यावर आता अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात आता तक्रार दिली आहे. फिर्यादिने सांगिलं की, मारहाण सुरू असताना नगरसेवक नितीन रोडे यांनी व्हिडिओ कॉलवरून ‘पायावर मारू नका, मुंडक्यावर मारा, त्याचं मुंडक माझ्याकडं आणा असा आदेश दिल्याचं फिर्यादीने तक्रारीत नमूद केलं आहे. या प्रकरणात अभिजीत कांबळे याच्या फिर्यादीवरून नितीन रोडे, आनंद कांबळे, सुरेश चौंडे, रतन आदोडे, संतोष इंदरकर उर्फ बन्नी, रोहन उर्फ गब्बर साळवे, दत्ता कुरूप यांच्यासह इतरांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परळी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.

संस्थाचालकाकडून कर्मचाऱ्याच्या पतीला मारहाण; बीडमध्ये वातापरण तापलं

अभिजीत नागेश कांबळे हा तरुण परळीतील भीमनगरचा रहिवासी आहे. तो गेल्या तीन-चार वर्षांपासून परळीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहे. नितीन रोडे हेदेखील अजित पवार गटाचे नगरसेवक असून ते भीमनगरमधून निवडून आले आहेत. नितीन रोडे हा धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक आहे. धनंजय मुंडे यांच्यासोबत त्याचे सोशल मीडीयावर अनेक फोटो आणि व्हिडीओ आहेत. नितीन रोडे याने गेल्या वर्षांमध्ये दिवसांमध्ये राजकीय आशीवार्दाच्या बळावर परळीत स्वत:ची चांगलीच दहशत निर्माण केल्याचं समोर आलं आहे.

बीडच्या परळीत बीएलओला लाथा बुक्क्यांनी मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सध्या एस आय आर नोंदणीचा दुसरा टप्पा सुरू असून शहरातील पेठ मोहल्ला येथे असलेल्या शादी खाना कॅम्पमध्ये बीएलओ म्हणून काम करणारे शिक्षक महफूज जाकीर शेख यांना कॅम्प मध्ये येत मतदानाचे फॉर्म घेऊन आमच्या घरी का येत नाही असं म्हणत चौघांकडून चापटा बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

इतकंच नाही तर या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा मागे घेतला नाहीस तर आम्ही बाहेर येऊन तुला बघून घेऊ या भाषेत धमकी दिली. दरम्यान, या प्रकरणी शाकीर अहमद शेख,जुनेद शेख, शोएब शेख आणि एक अनोळखी इसम अशा चौघा विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास परळी शहर पोलीस करत आहेत.

follow us