मेटाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड? फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरताना जगभरातील नागरिकांना अडचणी

अमेरिकेसह भारत, कॅनडा, मेक्सिको, ब्रिटन आणि युरोपमधील वापरकर्त्यांनी फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरताना समस्या येत असल्याच्या तक्रारी केल्या.

  • Written By: Published:
Untitled Design (59)

Technical failure in Meta’s servers : फेसबुक आणि इंस्टाग्राम या जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सेवांमध्ये रविवारी पहाटे अचानक बिघाड झाल्याने जगभरातील लाखो वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अमेरिकेसह भारत, कॅनडा, मेक्सिको, ब्रिटन आणि युरोपमधील अनेक देशांतील वापरकर्त्यांनी फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरताना समस्या येत असल्याच्या तक्रारी केल्या. त्यामुळे सोशल मीडियावर एकाच खळबळ उडाली.

आउतेज ट्रॅकिंग संकेतस्थळांवर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या वेळेनुसार पहाटे साडेतीनच्या सुमारास समस्यांना सुरूवात झाली. अनेक वापरकर्त्यांना फेसबुकवर लॉगिन करता येत नव्हते, तर काहींची खाती अचानक अनुपलब्ध झाल्याचे दिसत होते. फेसबुक उघडण्याचा प्रयत्न केल्यावर तुमचे खाते सध्या संकेतस्थळावरील तांत्रिक समस्येमुळे उपलब्ध नाही. ही समस्या लवकरच दूर होईल, असा संदेश दिसत असल्याचे वापरकर्त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, काही वापरकर्त्यांना मोबाईलवर फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरता येत होते, मात्र डेस्कटॉप किंवा वेब ब्राऊझरवर अडचणी येत असल्याचे समोर आले. त्यामुळे ही समस्या सर्व्हरशी संबंधित असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. काही वापरकर्त्यांना तर तुमचे खाते तात्पुरते बंद करण्यात आले आहे असा संदेशही दिसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

‘ही दुसरी स्वातंत्र्य चळवळ’, संसदेवरील मोर्चा होणारच! रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा संदेश

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोन्ही सेवा मेटा कंपनीच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे या दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकाचवेळी समस्या निर्माण झाल्याने मेटाच्या तांत्रिक यंत्रणेत काही अडथळा निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली. जगभरातील हजारो वापरकर्त्यांनी सोशल मीडिया आणि विविध ऑनलाइन मंचांवर याबाबत अनुभव शेअर करत सेवा सुरळीत करण्याची मागणी केली.

यापूर्वीही मेटाच्या सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 2021 मध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजर या सेवांमध्ये जवळपास सहा तासांचा जागतिक स्तरावरील मोठा बिघाड झाला होता. त्यावेळी कंपनीने नेटवर्कमधील तांत्रिक बदलांमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान, फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये निर्माण झालेल्या ताज्या समस्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मेटाकडूनही याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसून तांत्रिक पथक या समस्येवर काम करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी वापरकर्त्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. मात्र या घडामोडींमुळे पुन्हा एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या तांत्रिक सुरक्षेचा आणि स्थैर्याचा प्रश्न चर्चेत आला आहे.

follow us