IND vs ENG 1st ODI : पहिला एकदिवसीय सामना, भारताची प्रथम गोलंदाजी; ‘या’ खेळाडूला संघात संधी
IND vs ENG 1st ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बर्मिंगहॅममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम गोलंदाजी
IND vs ENG 1st ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बर्मिंगहॅममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे. पाच टी20 सामन्यांची मालिका 4-0 ने गमावल्यानंतर आता भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत काय करणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
भारतीय संघता एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) , विराट कोहली ( Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांचा पुनरागमन होत आहे. 19 नोव्हेंबर 2023 नंतर पहिल्यांदाच हे तिन्ही खेळाडू या प्रकारात एकत्र खेळताना दिसतील. भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदरसह प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे. तर अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादवला पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात संधी मिळालेली नाही.
दोन्ही संघांनी आतापर्यंत 110 एकदिवसीय सामने खेळले आहेत त्यापैकी भारताने 61 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 44 सामने जिंकले आहेत. दोन सामने बरोबरीत सुटले, तर तीन सामन्यांचा निकाल लागला नाही.
🚨 Toss 🚨
England have won the toss and elected to bat first in the 1st ODI.
Updates ▶️ https://t.co/2sg194tpxH #TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/SCsu3zloxM
— BCCI (@BCCI) July 14, 2026
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन
हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, जोश टोंग, आदिल रशीद.
A look at #TeamIndia‘s Playing XI 🙌
Updates ▶️ https://t.co/2sg194tpxH #ENGvIND pic.twitter.com/J6HYlKXV1l
— BCCI (@BCCI) July 14, 2026
भारतीय प्लेइंग इलेव्हान
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, गुरनूर ब्रार, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा
मोदी जी न्याय द्या, 20 दिवसात 2 पिढ्या संपल्या अन्… राखी अग्रवाल यांचा PM मोदींना पत्र