भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, तीन चेहरे गायब; ‘या’ खेळाडूची वापसी

England Playing 11 vs India 1st Test : इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी (IND vs ENG 1st Test) अकरा खेळाडूंच्या टीमची घोषणा केली आहे. दोन्ही संघातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले येथे 20 जूनपासून सुरू होणार आहे. इंग्लंडच्या संघात क्रिस वोक्सचे पुनरागमन झालं आहे. याचबरोबर अष्टपैलू ब्रायडन कार्सलाही संधी मिळाली आहे. सामन्याच्या दोन दिवस आधीच इंग्लंडच्या संघाची घोषणा झाली आहे. टीम इंडियाने (India vs England) अद्याप संघाची घोषणा केलेली नाही.
इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन गोलंदाजांचा समावेश केला आहे. बेन स्टोक्सही आहे. स्टोक्स वेगाने गोलंदाजीही करू शकतो. शोएब बशीर एकमेव फिरकी गोलंदाज आहे. उपकर्णधार ओली पोप तिसऱ्या नंबरला फलंदाजीसाठी येईल. तर सिनियर फलंदाज जो रूट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल. जॅक क्रॉली आणि बेन डकेट इंग्लंडच्या डावाची सुरुवात करतील. तीन नंबरवर ओली पोप असेल. यानंतर चार नंबरवर जो रुट असेल. पाच, सहा, सात नंबरवर अनुक्रमे हॅरी ब्रूक, कर्णधार बेन स्टोक्स आणि विकेटकीपर जॅमी स्मिथ असेल. इंग्लंडने जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन आणि सॅम कूक या तिघांना मात्र वगळलं आहे.
भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! महामु्काबला ठरला; ICC कडून टी20 विश्वचषकाची घोषणा
संघात तळाला फलंदाज आहेत. आठ नंबरला क्रिस वोक्स तर नऊ नंबरला ब्रायडन कार्स खेळतील. दोघेही चांगली फलंदाजी करतात. वोक्स कसोटी सामन्यात अनेकदा उपयुक्त ठरला आहे. यानंतर वेगवान गोलंदाज जोश टंग आणि शेवटी स्पिनर शोएब बशीर आहे. इंग्लंडच्या अंतिम अकरा खेळाडूंच्या टीममध्ये जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॅमी स्मिथ, क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर यांचा समावेश आहे.
भारताचा संघ जााहीर नाही
पहिल्या कसोटीसाठी भारताने अद्याप संघाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे संघात अकरा खेळाडू कोणते असतील याची उत्सुकता कायम आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात प्लेइंग इलेव्हन कशी असेल याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह या सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले आहे. त्याच्या जागी कुणाला संधी मिळते हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
भारतीय संघाला धक्का, इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन स्टार खेळाडू बाहेर, ‘या’ खेळाडूंना संधी