पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शशिकांत शिंदे स्पष्टच बोलले
Shashikant Shinde Exclusive : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज नागपूर येथे पार पडले असून आता राज्यातील 29 महानगर पालिकेच्या
Shashikant Shinde Exclusive : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज रविवारी शेवटचा दिवस होता. नागपूर येथे 8 डिसेंबरपासून सुरु झालेल्या या अधिवेशनात विरोधकांनी रोजगार, शिक्षण आणि राज्यातील इतर महत्वाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला कोंडीत धरले होते. तर आता अधिवेशन संपल्याने राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग लवकरच कार्यक्रम जाहीर करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. महायुतीमधील घटक पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गट मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील महत्वाच्या महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
तर पुणे (Pune Municipal Corporation) आणि पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेसाठी (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती होणार असल्याचे संकेत दोन्ही पक्षातील नेत्यांकडून देण्यात आले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाते नेते प्रशांत जगताप यांनी पुणे महानगर पालिकेसाठी युती होणार नसल्याची माहिती लेट्सअप मराठीशी बोलताना दिली होती त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र येणार की नाही याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी मोठी अपडेट दिली आहे. ते आज नागपूर येथे लेट्सअप मराठीशी (Letsupp Marathi) बोलत होते.
लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का यावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, मी 20 तारखेला संबंधित असलेल्या पक्षाच्या बैठका घेणार आहे. पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला बैठका घेतोय त्या बैठका झाल्यानंतर मग आम्ही ठरवणार आहोत काय करायचं. स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिलेला आहे त्यांच्याशी चर्चा करून आम्ही तिथे निर्णय घेऊ असं लेट्सअप मराठीशी बोलताना शशिंकात शिंदे म्हणाले.
पुढच्या दोन वर्षात 1 लाख 20 हजार सरकारी नोकऱ्या देणार, CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा-
तसेच त्यांनी या मुलाखतीमध्ये मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत निशाणा साधला. या प्रकरणात अजित पवार यांना या प्रकरणात अधिकाऱ्यांवर दोष देता येणार नाही असं म्हंटल आहे. राज्यमंत्री सभागृहात गैरहजर असणे हे सरकारचं फेल्युअर आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील मंत्री उपस्थित राहत नसेल तर एकतर ते घाबरतात आणि इथून पळून जायचा प्रयत्न करतात. समोरे जायला त्यांना भीती वाटत असेल असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
