नुकसानग्रस्तांना लवकर मदत नाही मिळाली तर आम्ही मंत्र्यांना… शशिकांत शिंदे यांचा थेट इशारा
आम्हाला यामध्ये काही राजकारण करायचे नाही. पण, सरकारने लवकरात लवकर मदत नाही केली तर आम्ही मंत्र्यांना फिरू देणार नाही असं शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र मध्ये गेल्या काही महिन्यापासून अतिवृष्टी होत आहे. त्यामध्ये अनेक जिल्हे पूरग्रस्त झालेत. (Rain) शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे मागच्या वेळंची मदत न पाहता सरसकट आता मदत व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
राज्याची लोकसंख्या बघता केंद्रातून मदतीची गरज आहे. राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागावी. सध्याच्या परिस्थितीत उद्या काही ठिकाणी आम्ही बळीराजाला मदत करण्यासाठी अन्नधान्य काही वस्तू पाठवण्याच्या सुरुवात करत आहोत अशी माहितीही शिंदे यांनी दिली.
त्याचबरोबर आत्महत्या वाढलेल्या आहेत ते होऊ नये म्हणून सरकारला विनंती आहे, उद्या कॅबिनेट आहे. मदत जाहीर करावी. आज आम्ही राजकारण करणार नाही पण पाहिजे ती मदत जाहीर केली नाही तर आम्ही मंत्र्यांना फिरू देणार नाही असा थेट इशाराच शिंदे यांनी दिला आहे.
राज्यांमध्ये धनगर समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे. केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार आहे. म्हणून निर्णयाच्या संदर्भाने विचार करायला हवा. आंदोलन करणारे आणि भाजपच्या मंत्र्यांची चर्चाही झाली आहे. त्यामुळे आता सरकारने काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा असंही शिंदे म्हणाले आहेत.