पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत सत्तेत जाणार? ‘आघाडी झाली याचा अर्थ…’ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

NCP Sharad Pawar Party अशा चर्चांना उधाण आलेले आहे. त्यावर आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शशिकांत शिंदेंना पश्न विचारला गेला

Sharad Pawar On PM Modi

Shashikant Shinde on NCP Sharad Pawar Party going in Power with NDA : राज्यामध्ये महानगर पालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या युत्या आणि आघाड्या झाल्या. त्यात सर्वांत लक्ष लागलेली युती होती ती पुण्यामध्ये झालेली अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची युती त्यामुळे राज्यासह देशाच्या राजकारणात देखील ते एकत्र येणार अशा चर्चांना उधाण आलेले आहे. त्यावर आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शशिकांत शिंदेंना पश्न विचारला असता त्यांनी त्यावर उत्तर दिले.

काय म्हणाले शशिकांत शिंदे?

आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शशिकांत शिंदेंना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष NDA सोबत सत्तेत जाणार का? असा पश्न विचारला गेला होता. त्यावर शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षठिकाणी एकत्र आलेला आहे. आम्ही त्यांच्या पक्षात विलीन होतं नाही. आघाडी झाली याचा अर्थ विलीनीकरण असा होतं नाही. आम्ही भाजप विरोधात लढत आहोत.

Video : आज 31 डिसेंबर! पुणे-मुंबईसह देशातील महत्वाच्या शहरात पोलीस तैनात, दिला कडक इशारा

तसेच ते पुढे म्हणाले की, आमचं त्यांचं युती झाली आहे. हा प्रश्न सर्व पक्षांना लागू होतो. फक्त अजित पवार गट याला अपवाद नसून देशआत देखील अनेक गुन्हेगारांना तिकीटं दिले गेले आहेत. याबाबत कायदानियम तयार झाले पाहिजे. मी सांगून काही होईल का? लोकशाहीत उमेदवार अर्ज दाखल करण्याची तरतुद आहे. त्यानुसार राजकारणातील गुन्हेगारीकरण थांबले पाहिजे. असं म्हणज एकप्रकारे शिंदेंनी अजित पवारांची पाठराखण केली आहे.

Dr. Suhas Kamble : टीका नाही, विकासावर बोलायचंय… डॉ. सुहास कांबळे यांचा पॅटर्नच वेगळा

आंबेडकरी चळवळीच्या पक्षांनी आमच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडी मजबूत करू. 29 महापालिका निवडणुकीत आम्ही 6 ठीकाणा स्वबळावर, 11 काँग्रेस सोबत, 11 उद्धव ठाकरे शिवसेना सोबत, 5 मनसे सोबत, 3 NCP अजित पवार, 7 ठिकाणी स्थानिक ठिकाणी आघाडी करतोय. त्यामुळे आम्ही एकत्रित अजेंडा प्रकाशित करू. प्रांत वाद, भाषिक वाद निर्माण होत आहे का? बाहेरच्या राज्यातील नेत्यानं बोलावले जात आहे.

वंचितने दिला काँग्रेसला धक्का, मुंबईत तब्बल 16 जागांवर उमेदवारच नाही; कारण काय?

तर मुंबईमध्ये भाजपमध्ये गेलेल्या राखी जाधवांवर बोलताना शिंदे म्हणाले की, कोणाच्या जाण्याने काय फरक पडत नही त्यांना वाटते आपण bjp कडूनच निवडून येऊ शकतो असं त्यांची मानसिकता झाली याचं कूनकून आम्हाला लागली होती. म्हणून त्यांनी निर्णय घेतला. तसेच कुणालाही अजित पवारांच्या पक्षामध्ये जाण्याचे सांगितले नव्हते.

follow us