Pune Airport : मोठी बातमी! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या 7 महिन्यांनी जेरबंद

Pune Airport : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अहिल्यानगरसह पुणे जिल्ह्यात

  • Written By: Published:
Pune Airport

Pune Airport : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अहिल्यानगरसह पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात काही लोकांना जीव देखील गमवावे लागले आहे. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी लवकरात लवकर  उपायोजना करण्यातय यावी अशी मागणी लोकांकडून होत आहे. तर यातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी अपडेट समोर आली आहे.

एप्रिलपासून पुणे विमानतळ (Pune Airport) परिसरात फिरणाऱ्या बिबट्याला अखेर सुरक्षितरीत्या पकडण्यात यश आले आहे. पुणे वन विभाग, RESQ चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय हवाई दल आणि पुणे विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त ऑपरेशनमुळे हे जिकिरीचे काम शक्य झाले. पुणे विमानतळावर हा बिबट्या 28 एप्रिल 2025 रोजी प्रथमच दिसला होता. त्यानंतर अनेक महिन्यांपर्यंत तो विमानतळ परिसरातील बोगदे, दाट झाडी आणि कमी रहदारी असलेल्या परिसरात वावरत होता.

या ठिकाणी भारतीय हवाई दलाची ठिकाणी असल्यामुळे आणि विस्तीर्ण भाग असल्यामुळे या बिबट्याला जेरबंद करणे आव्हानात्मक ठरत होते. कॅमेरा ट्रॅप, लाईव्ह कॅमेरे आणि पिंजरे लावून या बिबट्यावर नजर ठेवली जात होती. मात्र एकदाही हा बिबट्या पिंजऱ्यात शिरला नव्हता.

आंध्र प्रदेशात मोठा अपघात, प्रवाशांनी भरलेली बस खड्ड्यात कोसळली; 9 जणांचा मृत्यू

पकडल्यानंतर बिबट्याला आरोग्य तपासणीसाठी बावधन येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून सध्या तो पूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

मोठी बातमी! माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन

follow us