भाजपचं धक्कातंत्र कायम! भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारचे नितीन नबीन

नबीन अवघ्या 45 व्या वर्षी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. या पदावर बसणारे ते सर्वात कमी वयाचे भाजपाचे नेते आहेत.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 14T222000.371

भाजपाचे नेते तथा बिहार सरकारमध्ये (BJP) मंत्री असलेल्या नितीन नबीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते पटणा जिल्ह्यतील बांकीपूर येथून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे ते वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. या पदावर बसणारे ते सर्वात कमी वयाचे भाजपाचे नेते आहेत. ते भाजपाचे दिवंगत नेते नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे पुत्र आहेत. सध्या ते बिहार सरकारमध्ये मंत्री आहेत.

नितीन नबीन हे बिहारचे मंत्री आहेत. ते 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तसंच ते 45 वर्षांचे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पक्षाचे अध्यक्ष बनले तेव्हा त्यांचं वय 50 होतं. पण नबीन यांचं वय 45 आहे. त्यामुळे भाजपने तरुण चेहऱ्याच्या हातात पक्षाची धुरा सोपवल्याची चर्चा आहे. नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होत नाही तोपर्यंत नितीन नबीन हेच राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत. नितीन नबीन यांनी 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत तब्बल 84,000 मतांनी विजय संपादीत केला होता. त्यांनी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे चिरंजीव लव सिन्हा यांचा पराभव केला होता.

तुमची सत्ता सत्त्याच्या बळावर उलथवून टाकू, रामलीला मैदानातून राहुल गांधींचा भाजप अन् RSSवर घाव

लोकसभा निवडणुकीनंतर जे पी नड्डा यांना केंद्रीय आरोग्य मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तेव्हापासून नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचा शोध पक्षात घेतला जात होता. नड्डा 2020 मध्ये अध्यक्ष बनले होते. अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ 2024 मध्ये संपला आहे. पण नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंच त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड करण्यात आल्याने नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होत नाही तोपर्यंत नबीन यांच्यावर ती जबाबदारी राहील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नबीन यांना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केलं. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. नितीन नबीन यांनी स्वतःला एक मेहनती भाजप कार्यकर्ता म्हणून स्थापित केले आहे. ते एक तरुण, समर्पित आणि संघटनात्मकदृष्ट्या अनुभवी नेते आहेत. ज्यांचा बिहारमध्ये आमदार आणि मंत्री म्हणून अनेक कार्यकाळात प्रभावी कामगिरी आहे. त्यांनी लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण समर्पण आणि वचनबद्धतेने काम केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड कशी होते?

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद हे पक्षाच्या संविधानानुसार दिलेल्या प्रक्रियेद्वारे निवडले जाते.

पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया

प्रत्येक राज्यात राज्य कार्यकारिणी तयार केली जाते.
त्या कार्यकारिणीतून राष्ट्रीय प्रतिनिधी निवडले जातात.
हे राष्ट्रीय प्रतिनिधी पुढे राष्ट्रीय कार्यकारिणीत सहभागी होतात.
राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही या राष्ट्रीय प्रतिनिधींच्या मतांवरून होते.

निवडणूक अधिकारी

निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी नेमला जातो.
अर्ज, नामनिर्देशन, मतमोजणी ही प्रक्रिया त्यांच्या देखरेखीखाली पार पडते.

सहसा एकमुखी निवड

बहुतेक वेळा पक्षांतर्गत एकता आणि सहमतीच्या आधारे एकमेव उमेदवाराच्या नावावर एकमुखी निवड होते. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची गरज पडत नाही.

follow us