विशाळगड मशीद तोडफोड प्रकरण; शाहू महाराजांनी वारसा जपला, नागरिकांची विचारपूस

विशाळगड मशीद तोडफोड प्रकरण; शाहू महाराजांनी वारसा जपला, नागरिकांची विचारपूस

Shahu Maharaj : विशाळगडावरील अतिक्रमण तोडफोड प्रकरणी खासदार शाहू महाराज (Shahu Maharaj ) यांनी आज विशाळगडावर जात तोडफोड झालेल्या मशिदीची विचारपूस केलीयं. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांच्या नेतृत्वाखाली शिवभक्तांनी रविवारी विशाळगडावरील अतिक्रमणाची तोडफोड केल्याचं समोर आलं होत. त्यानंतर पोलिस प्रशासनाकडून 600 शिवभक्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज शाहू महाराजांनी वारसा जपत स्थानिक नागरिकांची विचारपूस करत पाहणी केलीयं.

महाराष्ट्रातील लहान शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्याच्या योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

खासदार शाहू महाराजांसोबत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी रविवारच्या दिवशी विशाळगडावर कोणत्या नागरिकांनी येत अतिक्रमणाची तोडफोड केलीयं, याबाबत शाहू महाराजांनी विचारपूस केलीयं. तसेच ज्यांनी तोडफोड केली आहे, त्यांची नावेही स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आल्याचं बोललं जात आहे. यावेळी विशाळगडावरील हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजातील महिलांनी महाराजांनी संवाद साधत संपूर्ण गोष्टच सांगितल्याचं दिसून आलं.

Siddhant Chaturvedi: अभिनेत्याने तृप्ती डिमरीच्या यशाबद्दल थेटच सांगितले; म्हणाला, ‘ॲनिमल’ सिनेमाच्या पूर्वी…’

दरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांसह माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनादरम्यान परिसरातील वाहनांची आणि घरांची तोडफोड करण्यात आल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या घटनेनंतर पोलिसांकडून आता या प्रकरणी गुन्हे दाखल करायला सुरुवात झाली आहे.

विशाळगडावर सुमारे 158 अतिक्रमण आहेत यापैकी सहा अतिक्रमणांबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. त्यामुळे हे न्यायालयीन वाद सुरू असलेले अतिक्रमण सोडून अन्य अतिक्रमण काढण्यात यावीत. यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवभक्तांकडून विशाळ गडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात येत होती. याच मागणीसाठी रविवारी 14 जुलैला काही शिवभक्त थेट हे अतिक्रमण हटवण्यासाठी विशालगडावर पोहोचले. मात्र यावेळी हे आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

संतप्त जमावाने गडाच्या शेजारीच असलेल्या गजापूर या ठिकाणी काही घर दारासमोर लावलेल्या गाड्या त्यांच्यावर दगडफेक केली गाड्या उलथून टाकल्या तसेच घराला लावलेल्या आहेत. एका सिलेंडरचा स्फोट झाला. मात्र ही आग वेळीच नियंत्रणात आणल्याने अनर्थ टाळला. तसेच यामध्ये तलवारी, कोळते, कुदळ या शस्त्रांचा देखील वापर करण्यात आला. त्यामुळे सध्या परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असून पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube