पूजा खेडकरच पिंपरी-चिंचवड कनेक्शन; महापालिकेच्या ‘या’ रुग्णालयातूनही घेतलं दिव्यांग प्रमाणपत्र
IAS Pooja Khedkar : वादग्रस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं आकणखी एक प्रकरण समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयानेही (PMO) त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं उघड झालं आहे. (Pooja Khedkar) दरम्यान, अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं यापूर्वी उघड झालं आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड येथील प्रकरण समोर आलं आहे.
सात टक्के अस्थिव्यंग वादग्रस्त IAS पूजा खेडकरचे पाय खोलात; थेट पीएमोने घेतली दखल, अहवाल पाठवण्याचे आदेश
पूजा खेडकर यांनी ७ टक्के अस्थिव्यंग असल्याचं प्रमाणपत्र घेतल्याचा प्रकार उघड झाला. दरम्यान, खेडकर यांनी अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातूनही दिव्यांग प्रमाणपत्र घेतलं होतं. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून, जिल्हा शासकीय रुग्णालयातून २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि २०२० मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. त्यानंतर आता वायसीएम रुग्णालयातून ऑगस्ट २०२२ मध्ये ७ टक्के दिव्यांग असल्याबाबतचं प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामध्ये खेडकर यांना ७ टक्के अस्थिव्यंग असल्याचं नमूद केलं आहे.
औंध रुग्णालयाने त्यांचा अर्ज नाकारला
पूजा खेडकर यांचं दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्यानं दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवून त्या संदर्भातील अहवाल मागवला आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांनी पिंपरी- चिंचवड मधील औंध सर्वोपचार रुग्णालय आणि पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्यापैकी औंध रुग्णालयाने त्यांचा अर्ज नाकारला. तर, वायसीएम रुग्णालयाने त्यांना प्रमाणपत्र दिल्याचं उघड झालं आहे.
तपासणसी केली पूजा खेडकरच्या मागं चौकशीचं शुक्लकाष्ठ; वाशिमच्या महिला पोलीस टीमकडून तीन तास चौकशी
पूजा खेडकर यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यामध्ये ७ टक्के अस्थिव्यंग असल्याचं दिसून आलं. त्यानुसार, त्यांना ऑगस्टमध्ये प्रमाणपत्र दिलं आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, वायसीएम
समितीसमोर बाजू मांडेन
माझ्यावर व कुटुंबावर होत असलेल्या आरोपाबाबत मीडियासमोर किंवा सार्वजनिक बोलण्यास मी अधिकृत नाही. मला तशी परवानगी नाही. जे काही माझं स्पष्टीकरण असेल ते समितीसमोर मांडेल, असं प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी दिलं आहे.
– पूजा खेडकर