Ajit Pawar : पिंपरी-चिंचवड भाजपाला सोपं नाही : अजित पवारांनी लावली जोरदार फिल्डिंग

Ajit Pawar : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यापक जनसंपर्क

Ajit Pawar

Ajit Pawar : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यापक जनसंपर्क अभियानाला गती दिली आहे. निवडणूक जाहीर होताच महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचारावरून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर लघुउद्योग व्यावसायिक, विविध समाजघटक, अल्पसंख्याक समुदाय तसेच ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी निवडणूक प्रचार अधिक आक्रमक केला आहे.

गुरुवारी पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आयोजित विविध बैठकींमध्ये अजित पवार यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत शहराच्या सर्वसमावेशक विकासाचा अजेंडा मांडला. लघुउद्योगांना पूरक वातावरण, सक्षम पायाभूत सुविधा आणि सर्व समाजांना सोबत घेऊन विकास घडवण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने आयोजित उद्योजक मेळाव्यात उद्योगांच्या विकासासाठी दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत, प्रदूषणमुक्त शहरनिर्मिती, भक्कम पायाभूत सुविधा आणि प्रशासनाशी समन्वय राखणारे स्पष्ट व्हिजन असणे आवश्यक असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. लघुउद्योग व्यावसायिकांच्या प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, अल्पसंख्याक समाजातील नागरिकांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, आपण कधीही जात-पात न पाहता सेक्युलर विचारातून काम केले आहे. सर्व समाजांना प्रतिनिधित्व मिळावे आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष कायम प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ही निवडणूक व्यक्तीची नसून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भवितव्याची आहे. बदल हवा असेल तर संधी द्यावी लागते, असे सांगत येत्या 15 जानेवारीला मतांच्या रूपाने आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी केले.

शरद पवारांची साथ सोडली पण भाजपमध्येच प्रवेश का? राहुल कलाटे स्पष्टच म्हणाले

ख्रिश्चन समाजासोबत झालेल्या बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडवण्यासाठी तत्पर राहू, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. चिंचवडमधील उड्डाण पुलाला मदर तेरेसा यांचे नाव देण्यात आल्याचा उल्लेख करत, समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास हाच आपला मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध संघटनांकडून मिळणारा पाठिंबा ही आपल्या कामाची पावती असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

follow us