शरद पवारांची साथ सोडली पण भाजपमध्येच प्रवेश का? राहुल कलाटे स्पष्टच म्हणाले
Rahul Kalate On PCMC Election : पिंपरी महानगरपालिका निवडणुकी दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Rahul Kalate On PCMC Election : पिंपरी -चिंचवड महानगरपालिका निवडणुकी दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला असून आता भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल कलाटे यांनी लेट्सअप मराठीच्या लेट्सअप विशेष या कार्यक्रमात बोलताना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय का घेतला याबाबत भाष्य करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
लेट्सअप मराठीशी बोलताना राहुल कलाटे (Rahul Kalate) म्हणाले की, मी 2017 पासून नगरसेवक असून या भागात मोठ्या प्रमाणात काम झाली आहे. जवळपास 27 – 28 डीपी रोड झाले असून सीबीएससी स्कूल झाले असून बॅडमिंटन स्टेडियम झालं आहे. मात्र काही रस्त्याची कामे करत असताना तेव्हाचे पालिका आयुक्तांनी मला फोन करुन काम करत असताना अडचणी येत असल्याचे सांगितले होते. यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत माहिती देत मदतीसाठी विनंती केली होती.
तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अडचणी येणाऱ्या कामांना त्यांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात टाकण्यास सांगितले होते. यानंतर या कामासाठी येणाऱ्या अडचणी सगळे क्लिअर झाले. तसेच या भागातील काही सीबीएससी शाळांना फंड्सची आवश्यकता होती तेव्हा देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी मदत केली. तसेच त्यांनी इतर विकासकामांमध्ये देखील मदत केल्याने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला असं राहुल कलाटे म्हणाले.
तसेच स्थानिक पातळीवर भाजप प्रवेशाला विरोध होता मात्र येणाऱ्या काळात विरोध होणार नाही असा विश्वास देखील या मुलाखतीमध्ये राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.
मुकुंदनगरमध्ये उमेदवार का नाही? आमदार जगताप म्हणाले, संविधानाला मानणारे….
पिंपरी -चिंचवड महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट युतीसह निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
