मुकुंदनगरमध्ये उमेदवार का नाही? आमदार जगताप म्हणाले, संविधानाला मानणारे….
Sangram Jagtap Interview : राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर महापालिकेत कोण बाजी मारणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण
Sangram Jagtap Interview : राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर महापालिकेत कोण बाजी मारणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी युती करुन 34 जागांवर उमेदवार दिले आहे तर भाजप 32 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने महापौर कुणाचा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे अहिल्यानगर महापालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी लेट्सअप मराठीच्या लेट्सअप विशेष कार्यक्रमात बोलताना हिंदुत्वाच्या मुद्दयासह निवडणुकीनंतर अहिल्यानगरच्या राजकारणात काय होणार? याबाबत आपली भूमिका मांडली आहे.
लेट्सअप मराठीला (Letsupp Marathi) दिलेल्या या मुलाखतीमध्ये आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap Interview) यांना हिंदुत्वादी भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, स्थानिक पातळीवर काम करत असताना वर्षानुवर्षं काही प्रश्न भेडसावत राहतात. त्या प्रश्नावर काम करण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न केले की बदल झाला पाहिजे आणि बदल करण्यासाठी त्या मार्गाप्रमाणे काम करावा लागतो. यापूर्वी देखील स्थानिक पातळीवर हिंदुत्वासाठी काम केलं आहे पण आता हिंदुत्वासाठी उघडपणे काम करण्याची सुरुवात केली असल्याची प्रतिक्रिया या मुलाखतीमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
तसेच आमचा एका समाजाबद्दल आक्षेप नाही पण भारत देशात संविधानानुसार चालावा लागतो पण काही लोक ते मानत नसेल. विशेषता जिहादी लोक जे आहेत त्यांना जिहाद मान्य असते. ज्या लोकांना संविधान मान्य नसेल पण जिहाद मान्य असेल तर अशा प्रवृत्तीच्या लोकांवर आपल्याला बोलाव लागत तसेच काम देखील करावं लागतं असं देखील आमदार संग्राम जगताप म्हणाले.
तर या मुलाखतीमध्ये अहिल्यानगर शहरातील मुस्लिमबहुल मुकुंदनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार का? दिला नाही यावर देखील आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यावर बोलताना आमदार जगताप म्हणाले की, देशात लोकशाही असून कोणाला कुठे मत द्यायचे हे त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे. आपण म्हणून शकत नाही की, कोणाला मत देऊ नको. मुकुंदनगरमधून (Mukundanagar) माझ्याकडे असा एकही व्यक्ती आला नाही की, तो म्हणेल की, मी भारताच्या संविधानाला मानतो, तिरंग्याला मानतो, मी औरंगाजेबाला नाही तर मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो असं बोलणारा एकही व्यक्ती माझ्याकडे आला नाही त्यामुळे आम्ही त्या भागात उमेदवार दिले नाही असं आमदार जगताप म्हणाले.

…म्हणूनच पंतप्रधान मोदींची मुंबईतील सभा रद्द ; मनसे नेत्याचा दावा
तर दुसरीकडे या मुलाखतीमध्ये आमदार जगताप यांनी शहरात सुरु असणाऱ्या विकास कामावर देखील भाष्य केले. शहरात सुरु असणाऱ्या रस्त्याचे काम हे पूर्णत्वाकडे आलेले आहेत. आज उद्या पूर्ण होणार आहे. हे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु होणार असं आमदार जगताप म्हणाले.
