पिंपरी-चिंचवडमध्ये गावकी भावकीचे राजकारण; ‘या’ लढतींकडे शहराचे लक्ष
Pimpri-Chinchwad Election : अनेक गावांचे मिळून झालेली औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
Pimpri-Chinchwad Election : अनेक गावांचे मिळून झालेली औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. असे असले तरी, शहरातील नाते गोते, गावकी-भावकीचे राजकारण अद्याप कायम आहे. अनेक प्रभागात गावकी भावकीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. या लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
काही प्रभागात गाववाले समोरासमोर थेट लढत आहेत. प्रभाग 6 मध्ये योगेश लांडगे विरुद्ध संतोष लांडगे, प्रभाग क्रमांक 9 मध्ये शीतल मासुळकर विरुद्ध सारिका मासुळकर, प्रभाग 12 मध्ये पंकज भालेकर विरुद्ध शांताराम भालेकर, प्रभाग क्रमांक 16 मधील दोन जागांवर मोरेश्वर भोंडवे विरुद्ध दीपक भोंडवे आणि आशा भोंडवे विरुद्ध संगीता भोंडवे, प्रभाग क्रमांक 17 मध्ये सचिन चिंचवडे विरुद्ध शेखर चिंचवडे तसेच पल्लवी वाल्हेकर विरुद्ध शोभा वाल्हेकर विरुद्ध सुप्रिया बाल्हेकर, प्रभाग क्रमांक 20 मध्ये मनीषा लांडे विरुद्ध रश्मी लांडे हे समोरासमोर आले आहेत.
प्रभाग क्रमांक 23 व मध्ये तानाजी बारणे (Pimpri-Chinchwad Election) , विशाल बारणे व संतोष बारणे आणि ड जागेवर अभिषेक बारणे, प्रवीण बारणे, प्रभाग क्रमांक 24 अ मध्ये सिद्धेश्वर बारणे, संतोष बारणे, विश्वजीत बारणे आणि ड मध्ये मंगेश वारणे व नीलेश बारणे, प्रभाग क्रमांक 25 मध्ये राहुल कलाटे विरुद्ध मयुर कलाटे, प्रभाग क्रमांक 28 अ मध्ये शत्रुघ्न काटे विरुद्ध उमेश काटे, व जागेवर अनिता काटे विरुद्ध शीतल काटे, ड जागेवर संदेश काटे विरुद्ध नाना काटे, प्रभाग क्रमांक 30 मध्ये संजय काटे विरुद्ध रोहित काटे यांच्यात सामना आहे.
प्रभाग क्रमांक 31 मध्ये ज्ञानेश्वर जगताप विरुद्ध राजेंद्र जगताप, प्रभाग क्रमांक 32 क मध्ये उषा बोरे विरुद्ध उज्ज्वला ढोरे आणि ड जागेवर प्रशांत शितोळे विरुद्ध अतुल शितोळे असे समोरासमोर उमेदवार आहेत.
पिंपरी-चिंचवड भाजपाला सोपं नाही : अजित पवारांनी लावली जोरदार फिल्डिंग
गावकीच्या एकमुखी निर्णयामुळे कोण, विजयी होणार, हे ठरविले जाते. अधिक जण इच्छुक असल्यास आलटून पालटून एकाला संधी दिली जाते. पक्षही गावाच्या निर्णयासाठी तडतोड करत असल्याचे दिसून येते.
