मोठी बातमी! सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या ४० मतदान केंद्रांवर ‘मॉकपोल’; निवडणूक आयोगाचे आदेश

मोठी बातमी! सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या ४० मतदान केंद्रांवर ‘मॉकपोल’; निवडणूक आयोगाचे आदेश

Ahmednagar Lok Sabha MockPoll : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव सुजय विखे (Sujay Vikhe) यांना जिव्हारी लागला. तो पराभव पचवण त्यांना कठीण गेलं. दरम्यान, त्यांनी काही मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. (Lok Sabha) त्यानुसार या केंद्रांवरील मतांची पुन्हा मोजणी करण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडं केली होती. यापार्श्वभूमीवर आक्षेप घेण्यात आलेल्या या ४० मतदान केंद्रांवर मॉकपोल घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. त्यामुळे हा खासदार निलेश लंके यांना धक्का मानला जात आहे.

मतांची पडताळणी निवडणूक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची अन् चर्चा आंध्र प्रदेश विरुद्ध तमिळनाडूची; काय कनेक्शन?

विखे यांच्या आक्षेपानंतर आता निवडणूक आयोगाकडून अक्षेप असलेल्या बुथवरील ईव्हीएमची मेमरी रिकामी करुन मतांची पडताळणी केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्देशांमुळं विखेंसाठी हा दिलासा मानला जात आहे. पण या तपासातून काय समोर येतं हे पहाणं महत्वाचं असणार आहे.

असा होणार मॉकपोल

  • आक्षेप घेण्यात आलेल्या ४० ईव्हीएम मशिनची मेमरी रिकामी करणार
  • एका मशिनमध्ये प्रत्येकी १ ते १४०० मतं टाकता येणार
  • किती मतं द्यायची हे ठरवण्याचे अधिकार उमेदवारांना असणार आहे.
  • व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममशिनवरील मतांची पडताळणी होणार
  • ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पार पडणार

कार्यवाही करण्याचे आदेश

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ४० मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनची आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी व्हावी असा अर्ज पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ४ जूनला मतमोजणी पार पडल्यानंतर १० जून रोजी निवडणूक आयोगाकडं केला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला काल एक पत्र लिहून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार इथं आता मॉकपोल होणार आहे. पण आता ही प्रक्रिया नेमकी कधी पार पडते हे पहावं लागणार आहे.

२९ हजार मतांनी विजय पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; काय म्हणाले, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी?

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. यामध्ये एकीकडं भाजपचे विद्यमान सुजय विखे पाटील आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्यामध्ये लढत झाली होती. यामध्ये निलेश लंके यांचा अवघ्या २९ हजार मतांची विजय होऊन ते खासदार बनले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube