निवडणूक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची अन् चर्चा आंध्र प्रदेश विरुद्ध तमिळनाडूची; काय कनेक्शन?
US Election 2024 : सध्या अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक चर्चेत आहे. त्यामध्ये भारतीय सर्वात पुढे आहेत. कारण, निवडणूक अमेरिकेची असली तरी एक मुकाबला आंध्र प्रदेश विरुद्ध तमिळनाडू असा झालाय. (US Election) डोनाल्ड ट्रम्प त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोमवारी ते रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात पोहोचले आणि त्यांनी ओहायोचे सिनेटर जेडी वन्स यांची रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवड केली. (Republican Party) पण या निवडणुकीत दोन्ही पक्षांचं मोठं भारत कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणीही असले तरी उपराष्ट्रपती हा भारताशी कनेक्शन असणारा असेल हे निश्चित झालं आहे.
आंध्र प्रदेशचे जावई मोठी बातमी! ओमानच्या किनारपट्टीवर तेलाचं जहाज उलटलं, 13 भारतीयांसह 16 लोकांचा क्रू बेपत्ता
कमला हॅरीस या डेमोक्रॅटिक पक्षांकडून उपाध्यक्षपदासाठी आहेत. ज्यांना ‘महिला ओबामा’ म्हणूनही ओळखलं जातं. तर, दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाकडून जेडी वन्स हे रिंगणात आहेत. ज्यांचा जन्म ओहायो येथील मिडलटाउन येथे झाला. जेडी यांचं बालपण गरीबीत गेलं. त्यांना आजोबांनी वाढवलं. पुढे ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी आणि येल लॉ स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे सिलिकॉन व्हॅलीमध्ये व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणून काम करून त्यांनी व्यवसाय जगताचा अनुभव मिळवला. जेडी व्हॅन्स यांचं लग्न एका भारतीय मुलीशी झालं आहे, ज्यांचं नाव आहे उषा चिलुकुरी. एकीकडे कमला हॅरिस तर दुसरीकडे आंध्र प्रदेशचे जावई जेडी व्हॅन्स असा सामना रंगणार असल्याने अमेरिकेच्या निवडणुकीत यावेळी भारताचं नाव चर्चेत आहे.
उषा चिलुकुरी कोण आहेत?
जेडी वन्स यांच्या पत्नी उषा चिलुकुरी यांचा जन्म कॅलिफोर्नियातला, पण त्यांचे आई-वडील मूळचे आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पामारू गावचे आहेत. काही काळानंतर ते अमेरिकेतील सॅन डिएगो येथे स्थलांतरित झाले. त्यांचे वडील मेकॅनिकल इंजिनिअर तर आई बायोलॉजिस्ट होती. उषा यांनी केंब्रिज विद्यापीठातून मॉर्डन हिस्ट्री विषयात पदवी घेतली. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयासह विविध लॉ फर्ममध्ये त्यांनी काम केलं. २०१५ ते २०१७ पर्यंत कंपनीत काम तर २०१८ पर्यंत सर्वोच्च न्यायालयात कायदा लिपिक म्हणून काम केलं. सध्या ते सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसीमध्ये त्या वरिष्ठ वकील आहेत. उषा या हिंदू तर त्यांचे पती व्हॅन्स रोमन कॅथलिक आहेत.
जेडी वन्स यांच्या राजकीय प्रवासात उषा यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्या अनेकदा पतीसोबत राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसतात. आत्ताही रिपब्लिकन पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जेडी यांचं नाव जाहीर झालं तेव्हाही उषा तेथे उपस्थित होत्या. विशेष म्हणजे उषा यांच्या पालकांनीही तिच्या पतीच्या राजकीय कारकिर्दीला पाठिंबा दिलाय आणि अनेकदा त्यांच्यासोबत प्रचाराच्या कार्यक्रमांनाही जातात. दरम्यान दुसरीकडे कमला हॅरिस यासुद्दा भारतीय वंशांच्या असल्याने यावेळीची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल.