Russian presidential election : रशियात पुन्हा पुतिनच सत्तेवर, 88 टक्के मतांनी दणदणीत विजय
Russian presidential election : रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Russian presidential election) व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी सुमारे 88 टक्के मतांनी दणदणीत विजय नोंदवला आहे. पुतिन सलग पाचव्यांदा रशियाची कमान सांभाळतील. रविवारी मतदान संपल्यानंतर पहिल्या अधिकृत निकालांनुसार व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत 87.97 टक्के मतांनी विजय मिळवला, अशी बातमी रॉयटर्सने दिली.
पुणे-बंगळुर महामार्गावर भरधाव ट्रकने मजुरांना चिरडे, 4 जागीच ठार, 8 जखमी
रशियाच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अध्यक्षीय निवडणुकीत 80 लाखांहून अधिक मतदारांनी ऑनलाइन मतदान केले. रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्लादिमीर पुतिन यांनी पहिलं मतदान केले. या निवडणुकीत पुतिन यांना ८७.९७ टक्के मते मिळाली आहेत. दरम्यान, सुरुवातीच्या निकालांवरून असे म्हणता येईल की व्लादिमीर पुतिन हे रशियन जनतेचा विश्वास कायम ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. या विजयासह पुतिन यांना 6 वर्षांचा नवीन कार्यकाळ मिळाला आहे. यासह त्यांनी रशियात सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याच्या बाबतीत जोसेफ स्टॅलिन यांना मागे टाकले आहे.
पुणे-बंगळुर महामार्गावर भरधाव ट्रकने मजुरांना चिरडे, 4 जागीच ठार, 8 जखमी
राष्ट्रपती म्हणून त्यांची ही पाचवी टर्म असेल. पुतिन 1999 पासून रशियाचे अध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेत आहेत. प्रकृती अस्वास्थामुळं बोरिस येल्तसिन यांनी 1999 मध्ये रशियातील सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली. त्यानंतर त्यांनी एकही निवडणूक हरलेली नाही.
पुतिन चार वेळेस राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांची मते वाढली आहेत. सन 2000 मध्ये पुतिन पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडले गेले होते. त्यावेळी त्यांना 54 टक्के मते मिळाली होती. त्यानंतर 2004 मध्ये 72 टक्के आणि 2012 मध्ये 65 टक्के मत मिळाले होते. 2018 मधील निवडणुकीत पुतिन यांना 77 टक्के मते मिळाली होती.
या निवडणुकीत क्रेमलिनच्या जवळचे मानले जाणारे 71 वर्षीय पुतीन यांच्या विरोधात तीन प्रतिस्पर्धी रिंगणात होते. तिघांनीही पुतीन यांच्या 24 वर्षांच्या राजवटीवर किंवा दोन वर्षांपूर्वी युक्रेनविरुद्ध विशेष लष्करी कारवाई सुरू करण्याच्या निर्णयावर टीका करणे टाळले.
निवडणुका सुरू असतांना ड्रोन हल्ले
रशियातील अध्यक्षीय निवडणुका संपुष्टात येत असताना, युक्रेनने मॉस्को आणि इतर शहरांमध्ये अनेक ड्रोन हल्ले केले. रशियाच्या हवाई संरक्षण विभागाने सुमारे 35 ड्रोन हवेत नष्ट केले. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचा दावा रशियाने केला आहे.