Loksabha Election : रिपाईला एकही जागा नाही… पण आठवलेंना स्टार प्रचारक केले

Loksabha Election : रिपाईला एकही जागा नाही… पण आठवलेंना स्टार प्रचारक केले

Ramdas Athawale NDA star campaigner : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) एनडीएचा घटक पक्ष आणि राज्यातील महायुतीत सामील असूनही आरपीआयला (Republican Party of India)एकही लोकसभेची जागा मिळालेली नाही. रिपाईचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मागणी केली होती. पण, भाजपने तिथे त्यांचे उमदेवार घोषित केले. त्यामुळं आठवले नाराज असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत आठवलेंना एकही जागा मिळाली नाही, मात्र भाजपने त्यांना स्टार प्रचारक केलं.

Loksabha Election: ज्योती मेटे या पंकजा मुंडेंचे गणित बिघडविणार? 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानेही (Republican Party of India) आपल्याला दोन जागा मिळाव्या, अशी मागणी सातत्याने केली होती. भाजपकडून रिपाईला जागा मिळत नसल्यानं रामदास आठवलेंनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखलवली होती. नवीन आलेल्या पक्षांना जागा दिली जाते. पण जुन्या पक्षांना लक्षात ठेवलं जातं नाही, अशी टीका त्यांनी भाजपवर केली होती.

दरम्यान, लोकसभेची मागणी वगळता रिपाईला राज्यात मंत्रीपद हवं, विधानसभा निवडणुकीत ८ ते १० जागा मिळाव्या, महामंडळाचे अध्यक्षपद, सदस्यपद मिळावे, अशी मागण्या आठवलेंनी केल्या होत्या. त्या सर्व मागण्या भाजपकडून मान्य करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर आठवलेंची नाराजी दूर झाली असून भाजपने त्यांना महायुतीचे आणि एनडीएचे स्टार प्रचारक केलं.

आठवलेंचा ४ एप्रिल पासून देशभर दौरा
आठवलेंच्या त्यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष आहे. मित्रपक्ष भाजप आणि एनडीएच्या घटक पक्षातील उमेदवार आपल्या प्रचाराठी रामदास आठवलेंच्या सभांचे आयोजन करीत आहेत. त्यासाठी देशभरातून भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार आठवलेंच्या तारखा मागत आहेत. लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी असून पहिल्या टप्प्यातील विविध उमेदवारांच्या प्रचारासाठी आठवले येत्या ४ एप्रिल पासून देशभर दौरा करणार आहेत.

Loksabha Election: ज्योती मेटे या पंकजा मुंडेंचे गणित बिघडविणार? 

आठवले ४ एप्रिल रोजी तामिळनाडूत कन्याकुमारी येथे प्रचार दौऱ्यावर रवाना होत आहेत. त्यानंतर ५ एप्रिल रोजी उत्तराखंड मधील डेहराडून येथे ते भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. ६ एप्रिल रोजी पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशात लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचार सभांनाही ते संबोधित करणार आहेत.९ एप्रिलला आसाममध्ये आठवले लोकसभा निवडणुकीत भाजप आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. १० एप्रिल ते मणिपूर येथे प्रचार दौरा करणार आहेत. १२ एप्रिल ला महाराष्ट्रात नागपूर , चंद्रपूर, गडचिरोली येथे त्यानंतर १३ एप्रिलला भंडारा गोंदिया, रामटेक आणि नागपूर मध्ये महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार आठवले करणार आहेत.

१५ आणि १६ एप्रिलला आठवले महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांचा प्रचार करतील.त्यानंतर दि. १७ एप्रिल रोजी जयपूर राजस्थान जयपूर येथे भाजप उमेदवारांचा प्रचार ते करणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज