तुम्हाला निवडणुकीत ज्याला पाडायचे, त्याला पाडा; मनोज जरांगेंची लोकसभा निवडणुकीतून माघार

  • Written By: Published:
तुम्हाला निवडणुकीत ज्याला पाडायचे, त्याला पाडा; मनोज जरांगेंची लोकसभा निवडणुकीतून माघार

Manoj Jarange On Loksabha Election Maratha Candidate: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी लोकसभा निवडणुकीतून ( Loksabha Election) माघार घेतली आहे. प्रत्येक मतदारसंघात अपक्ष उमेदवार देण्याबाबतचा निर्णय त्यांनी रद्द केला आहे. लोकसभेसाठी योग्य पद्धतीने तयार झालेली नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवार देणार नाही. तुम्हाला निवडणुकीत ज्याला पाडायचे, त्याला पाडा, त्याचा कार्यक्रम करा, असे जरांगे यांनी जाहीर केले. तर निवडणुका संपल्यानंतर लगेच जून महिन्यात मोठी सभा घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे जरांगे यांनी जाहीर केले आहे.

परभणीतून महादेव जानकर लोकसभा लढणार, अजितदादा गटाच्या कोट्यातून रासपला जागा

मराठा बांधवांनी राजकीय सभेला जाऊ नये. जे सगे-सोयऱ्यांच्या आरक्षणाला पाठिंबा देईल, त्याला मतदान करा. तो उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला मतदान करा. तर ज्याला पाडायचे आहे. त्याला पाडा. त्याचा करेक्ट कार्यक्रम करा, असे आवाहनच जरांगे यांनी मराठा बांधवांना केले आहे.

Lok Sabha Elections : तुतारी हाती घेताच निलेश लंकेचा हल्लाबोल, पण विखेंचे नो कमेंट्स


जरांगे प्रचंड संतापले

लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार देण्याबाबत काही ठराव, बैठका घेण्याबाबत जरांगे यांनी सूचना दिल्या होत्या. राज्यभरातील समाज बांधवांना या सूचना होत्या. परंतु काही ठिकाणी उमेदवार देण्यावरून मोठे मतभेद दिसून आले. अपक्ष उमेदवार दिला तर तो उमेदवार पडेल, त्याला फायदा होईल, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. तसेच अनेक ठिकाणी उमेदवार देण्याबाबतच मराठा समाजाचे पाठिंबा देण्याच्या पत्रावर दहा ते पंधराच लोकांच्या सह्या होत्या. त्यावरून जरांगेंनी उमेदवारी मागणाऱ्यांना जोरदार फटकारले.

आणखी तुम्हाला पक्ष आणि नेत्याचा हवा का ?

राजकारणामुळे मराठा समाजाचे नुकसान झाले आहे. तरीही तुमच्या डोक्यात राजकारणाच आहे का ? ते डोक्यातून काढून टाका. आरक्षणाचा विचार करा. अजूनही तुमच्या डोक्यात हा पक्ष, हा नेताच का आहे, असा संतापजनक सवालही जरांगे यांनी बैठकीत उपस्थित केला. त्यामुळे राजकारणात पडून मी माझी जात मातीत घालणार नाही. यापुढे सगे-सोयऱ्यांसह आरक्षण मिळविण्यासाठी मी लढत राहणार आहे. जून महिन्यात मोठी सभा घेऊन निर्णय घेऊ.

तर विधानसभा लढू

लोकसभा निवडणूक लढू शकत नाही. परंतु आतापासून होतकरू तरुण तयार करा. अजूनही विधानसभेला खूप वेळ आहे. त्याची तयारी केली तर विधानसभा निवडणूक लढवू, असेही जरांगे यांनी जाहीर केले आहे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज