Lok Sabha Elections : तुतारी हाती घेताच निलेश लंकेचा हल्लाबोल, पण विखेंचे नो कमेंट्स

Lok Sabha Elections : तुतारी हाती घेताच निलेश लंकेचा हल्लाबोल, पण विखेंचे नो कमेंट्स

अहमदनगर – नगर दक्षिण लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) महायुतीकडून (Mahayuti) सुजय विखे (Sujay Vikhe) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके (Nilesh Lanke) हे उमेदवार असणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वीच लंके विरुद्ध विखे संघर्ष पेटला आहे. आमदारकीचा राजीनामा देत लंके यांनी विखेंवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, लंकेंनी केलेल्या टीकेवर खासदार सुजय विखेंनी भाष्य करण्यास टाळलं.

Ayesha Khan : आयेशा खानचा गुलाबी रंगाच्या साडीत हॉट अंदाज 

सुजय विखेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लंकेंनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता विखे म्हणाले की, तुम्ही ऐकलंय ना, मग मनोरजंन करा. मी माझ्या दौऱ्यात असल्या कारणाने ते काय बोलले ऐकले नाही, असे म्हणत विखेंनी लंकेवर भाष्य करणे टाळले. दरम्यान नगर दक्षिणेमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना लोकसभेत पाहायला मिळणार आहे.

Ayesha Khan : आयेशा खानचा गुलाबी रंगाच्या साडीत हॉट अंदाज 

पुढं बोलतांना सुजय विखे म्हणाले, दुष्काळाची दाहकता असून पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. निवडणुकीचा काळ सुरु असून पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागू नये याचेच टेन्शन माझ्या डोक्यात सुरु आहे. तसेच जिल्ह्यात पाण्याचे टँकर देखील सुरळीत सुरु आहे, असं देखील विखे यांनी स्पष्ट केले.

लंकेची टीका काय? 

लंके यांना शरद पवार गटात जाण्यास अजित पवार गटाकडून असलेली आमदारकी हा मोठा अडथळा ठरत होता मात्र, काल लंके यांनी आपल्या आमदराकीचा राजीनामा दिला. याप्रसंगी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकसभेचे रणशिंग फुंकण्यापूर्वी लंके यांनी विखे परिवारावर जोरदार टीका केली. विखे पिता-पुत्रांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. माझ्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायला लावले. त्यांचे पीए स्वतःचे पीए नियुक्त करतात आणि पैसे उकळतात. पाच वर्षे राज्यात खासदार व मंत्री असतानाही त्यांनी कोणतेही विकासकाम केले नाही. लंकेंनी पैसा नाही तर माणसं कमावली. लंके तुम्हाला मॅनेज होणार नाही. ते (सुजय विखे) म्हणतात मै हू डॉन, पण चार तारखेला लोक सांगतील की खरा डॉन कोण आहे, अशी टीका लंकेंनी केली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज