Mitwa Movie: ‘या’ खास कारणासाठी “मितवा” जोडी पुन्हा एकत्र 

Mitwa Movie: ‘या’ खास कारणासाठी “मितवा” जोडी पुन्हा एकत्र 

Mitwa Movie: सगळ्यांची लाडकी “मितवा” (Mitwa Movie) जोडी म्हणजे स्वप्नील आणि प्रार्थना लवकरच एका गाण्यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Marathi Movie) एवढ्या वर्षांनी या दोघांना मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. नुकतीच ही जोडी एअरपोर्ट वर स्पॉट झाली आणि आता हे दोघे पुन्हा “मितवा” रेऊनियन करणार का ? याबद्दल चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या.

अभिनयाच्या पलिकडे जाऊन स्वप्नीलने आता निर्मिती विश्वात देखील पदार्पण केलं आहे आणि त्याची निर्मिती असलेला “नाच गं घुमा” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला सुद्धा येणार असून स्वप्नीलने त्याचा आगामी “बाई गं” या चित्रपटाच्या शूटसाठी हे दोघे एकत्र आल्याचं सांगितलं आहे. “बाई गं” चित्रपटातील गाणं सोबतीने शूट करण्यासाठी “मितवा” जोडी सोबत आली आहे.

सिनेइंडस्ट्रीत या दोघांची सुपरहिट “मितवा” जोडी म्हणून अशी ओळख असताना आता “बाई गं” मध्ये हे पुन्हा सोबत दिसणार यावर शिक्कमोर्तब झाला आहे. येणाऱ्या काळात स्वप्नील खूप वैविध्यपूर्ण भूमिका करण्यासाठी सज्ज असून निर्मितीच्या सोबतीने त्याच्या अभिनयाने सगळ्यांची मन जिंकण्यासाठी तो जोरदार तयारी करत आहे. “नाच गं घुमा” आणि “बाई गं” या दोन मोठ्या चित्रपटातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

नताशा- धवलची बांधली गेली लग्नाची गाठ, पण काय नेमकं शिजतंय प्रियांशीच्या मनात?

“नाच गं घुमा” या चित्रपटाची निर्मिती परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, तृप्ती पाटील, शर्मिष्ठा राऊत व तिचा पती तेजस देसाई यांनी केली आहे. येत्या मे महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मधुगंधाने आपल्या इन्स्टाग्रमावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिले “लेखिका जेव्हा निर्माती बनते. आता आतुरता ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची. मे महिन्यात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित ‘नाच गं घुमा’. मधुगंधाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज