परभणीतून महादेव जानकर लोकसभा लढणार, अजितदादा गटाच्या कोट्यातून रासपला जागा

परभणीतून महादेव जानकर लोकसभा लढणार, अजितदादा गटाच्या कोट्यातून रासपला जागा

Mahadev Jankar will contest Lok Sabha from Parbhani  : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) परभणीतून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढणार आहेत. जानकर हे 1 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जानकरांचा उमदेवारी अर्ज दाखल करतांना स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत.

Tech layoffs : Apple, Dell सह अनेक कंपन्यांवर टाळेबंदीची टांगती तलवार, हजारो कर्मचारी बेरोजगार 

जानकर हे महाविकास आघाडीसोबत माढ्यातून लोकसभा लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, 24 मार्च रोजी झालेल्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांकडून जानकर यांची यांची मनधरणी करण्यात आली आहे. महायुतीच्या जागावाटपाच जानकर यांना एक जागा निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर आता ते परभणीतून 1 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जानकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. परभणीची जागा रासपला राष्ट्रवादीच्या कोट्यातून सोडण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे आता महादेव जानकर परभणी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत.

परभणीतून महादेव जानकर लोकसभा लढणार, अजितदादा गटाच्या कोट्यातून रासपला जागा 

याविषयी बोलतांना जानकर यांनी सांगितली की, महाविकास आघाडीला आम्ही तीन जागा मागितल्या होत्या. परभणी, माढा आणि सांगली ह्या जागा मागितल्या होत्या. पण, शरद पवारांनी फक्त माढ्याची जागा देऊ केली. त्यावेळी शिवसेना आणि कॉंग्रेसने कोणताही रिस्पॉन्स दिला नाही. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. मात्र, महायुतीकडे आम्ही दोन जागा मागितल्या होत्या. त्यांनी अजितदादांच्या कोट्यातून आम्हाला परभणीची जागा दिली. आता 1 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहे.

दरम्यान, सध्या परभणीत ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांना ठाकरे गटाने उमदेवारी दिली असून परभणीत संजय जाधव विरुध्द महादेव जानकर असा सामना रंगणार आहे.

महायुतीकडे तटकरेंनी मागितल्या सात जागा
सुनील तटकरे यांनी महायुतीकडे सहा ते सात जागा मागितल्याचं सांगितलं. रायगडमधून सुनील तटकरे रिंगणात आहेत. बारामतीतून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित, तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube